जसप्रीत बुमराह MCG चा नवा 'विकेट किंग', ट्रेव्हिस हेडला शून्यावर आऊट करत रचला इतिहास

IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या चौथ्या सामन्यात बुमराहने ट्रेव्हिस हेडला शुन्यावर बाद करून MCG वरील भारताचा दिग्गज माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडला.

पुजा पवार | Updated: Dec 26, 2024, 03:59 PM IST
जसप्रीत बुमराह MCG चा नवा 'विकेट किंग', ट्रेव्हिस हेडला शून्यावर आऊट करत रचला इतिहास  title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 4th Test : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या जबरदस्त फॉर्मात असून त्याने हाच फॉर्म बॉक्सिंग-डे टेस्‍ट मेलबर्नमध्येही सुरु ठेवलाय. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) टेस्ट सीरिजच्या चौथ्या सामन्यात बुमराहने ट्रेव्हिस हेडला शुन्यावर बाद करून MCG वरील भारताचा दिग्गज माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडला. बुमराहने भारतीय गोलंदाज म्हणून MCG वर नवा इतिहास रचला. 

26 डिसेंबर पासून मेलबर्न येथे बॉक्सिंग डे टेस्ट सामन्याला सुरुवात झाली. मेलबर्न टेस्टचा पहिला दिवस हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला. बॉक्सिंग टेस्टच्या पहिल्या दिवशी 86 ओव्हर्स झाल्या असून यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स गमावून 311 धावा केल्या. तर भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने घेतल्या. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानात धडाकेबाज कामगिरी करत असताना जसप्रीत बुमराहने महत्वाच्या 3 फलंदाजांना बाद करून त्यांच्या रनमशीनला ब्रेक लावला. 

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या ज्यात उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श यांचा समावेश होता. यापूर्वी माजी गोलंदाज अनिल कुंबळे हे MCG मध्ये सर्वाधिक 15 विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज होते. मात्र ट्रेव्हिस हेडला बाद केल्यावर बुमराहने MCG वर घेतलेल्या विकेट्सची संख्या 18 वर पोहोचली. तर याबाबत रविचंद्रन अश्विन आणि कपिल देव हे तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 14 विकेट्स घेतले आहेत. 

हेही वाचा : विराट कोहलीवर ICC करणार कारवाई? मैदानात 'तो' धक्का मारणं महागात पडणार, थेट बंदी घालणार?

MCG मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय फलंदाज : 

खेळाडू    सामने      इनिंग    विकेट
जसप्रीत बुमराह      3      5      18
अनिल कुंबले       3    6     15
कपिल देव       3   6      14
रविचंद्रन अश्विन      3     6     14
उमेश यादव        3    6      13

जसप्रीत बुमराहच्या बॉलवर ट्रेव्हिस हेडची दांडी गुल : 

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रेव्हिस हेड याने तिसऱ्या टेस्ट सामन्यात शतकीय कामगिरी केली होती. त्यामुळे मेलबर्न टेस्टमध्ये त्याचा हाच फॉर्म कायम राहील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र जसप्रीत बुमराहने तसं होऊ दिलं नाही. बुमराहने 67 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर हेडला स्टंप आउट केले. बुमराहने टाकलेला बॉलला हिट करण्यासाठी हेडने बॅट फिरवली पण बॉल हुकला आणि थेट लेग स्टंपवर जाऊन आदळला. ज्यामुळे हेडला शुन्य धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतण्याची वेळ आली. सध्या या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. 

भारतीय संघाची प्लेईंग 11 : 

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप