कोहलीची ‘विराट’ कामगिरी, आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल!

विराट कोहलीनं आयसीसीच्या वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागं टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. उद्या म्हणजे ५ नोव्हेंबरला कोहलीचा वाढदिवस आहे. योगायोगानं त्याआधीच त्याला बर्थडे गिफ्ट मिळालंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 4, 2013, 09:03 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विराट कोहलीनं आयसीसीच्या वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागं टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. उद्या म्हणजे ५ नोव्हेंबरला कोहलीचा वाढदिवस आहे. योगायोगानं त्याआधीच त्याला बर्थडे गिफ्ट मिळालंय.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये त्यानं ११४.६६च्या सरासरीनं ३४४ रन्स केले. यामध्ये दोन हाफ सेंच्युरीज आणि दोन सेंच्युरीजचा समावेश होता. या चांगल्या कामगिरीचा फायदा त्याला रँकिंगमध्ये झाला आणि त्यानं नंबर वनचं स्थान काबीज केलं. आपल्या वन-डे करिअरमध्ये विराटनं पहिल्यांदा आसीसी वन-डे रँकिंगमध्ये टॉप पोझिशन पटकावली आहे.
सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर वनडे फलंदाजीच्या रँकिंगमध्ये अव्वल होणारा कोहली तिसरा भारतीय बॅट्समन ठरलाय.
कोहलीप्रमाणं ऑस्ट्रेलियन कर्णधार जॉर्ज बेली यालादेखील भारतातील वनडेत केलेल्या धडाकेबाज कामगिरीचा रँकिंगमध्ये फायदा झाला. बेलीला सहा क्रमांकाचा फायदा झाला असून तो बॅट्समनच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताचा शिखर धवन कारकिर्दीत प्रथमच पहिल्या २०मध्ये आलाय. तो १२व्या क्रमांकावर आहे.
त्याचा सलामीचा जोडीदार अन् ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये द्विशतक करणारा रोहित शर्मादेखील रँकिंगमध्ये कसा मागे राहील? सामनावीर अन् मालिकावीर अशी दोन्ही बक्षिसं पटकावणाऱ्या रोहितनं फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पंधराव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रोहितनं १२२.७५च्या सरासरीनं ४९१ रन्स काढले.
वनडे बॅट्समनच्या रँकिंगमध्ये पहिल्या २०मध्ये आता भारताचे पाच बॅट्समन आहेत. त्यात
कोहली (१), महेंद्रसिंग धोनी (६), शिखर धवन (११) रोहित शर्मा (१५) आणि सुरेश रैना (१९)व्या स्थानावर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.