कोहलीच्या ‘विराट’ खेळीनं टीम इंडियानं गाठलं ‘शिखर’!

टीम इंडियानं पुन्हा एकदा आपला लढाऊ बाणा दाखवत अतिशय अटीतटीच्या मॅचमध्ये कांगारूंचा ६ विकेट्स आणि ३ बॉल्स राखून पराभव करत दणदणीत विजयाची नोंद केली आणि सीरिजमध्ये बरोबरी साधली. टीम इंडियाच्या या अतिशय रोमहर्षक विजयाचा शिल्पकार ठरला तो सेंच्युरियन विराट कोहली आणि शिखर धवन.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 31, 2013, 10:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
टीम इंडियानं पुन्हा एकदा आपला लढाऊ बाणा दाखवत अतिशय अटीतटीच्या मॅचमध्ये कांगारूंचा ६ विकेट्स आणि ३ बॉल्स राखून पराभव करत दणदणीत विजयाची नोंद केली आणि सीरिजमध्ये बरोबरी साधली. टीम इंडियाच्या या अतिशय रोमहर्षक विजयाचा शिल्पकार ठरला तो सेंच्युरियन विराट कोहली आणि शिखर धवन.
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३५१ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या बॅट्समन्सनी नागपूर वन-डेत रन्सचा पाऊस पाडला आणि ६ विकेट्ससह ३ बॉल्स राखत दणदणीत विजयाची नोंद केली. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो नॉट आऊट ११५ रन्सची खेळी करणारा विराट कोहली.
या सीरिजमध्ये दुसरी सेंच्युरी झळकावणाऱ्या विराटनं करिअरमधील १७वी सेंच्युरीही पूर्ण केली. विराटनं तब्बल ६६ बॉल्सचा सामना करताना १८ फोर आणि १ सिक्सच्या मदतीनं सेंच्युरी ठोकली. तर शिखर धवननंही करिअरमधील चौथ्या सेंच्युरीची नोंद केली. धवननं १०२ बॉल्समध्ये ११ फोरच्या सहाय्यानं १०० रन्स केले. फॉल्कनरनं त्याची विकेट घेत भारताला दुसरा धक्का दिला.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं शेन वॉटसनची सेंच्युरी आणि कॅप्टन जॉर्ज बेलीच्या दिडशतकी खेळीच्या जोरावर ५० ओव्हर्समध्ये ६ विकेट्स गमावून ३५० रन्सपर्यंत मजल मारली होती.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी १७८ रन्सची मजबूत ओपनिंग करून दिली. दरम्यान रोहित शर्मानेही हाफ सेंच्युरी झळकावली. बॅट्समन्सच्या धडाक्यामुळं सीरिजमध्ये बरोबरी साधणारी टीम इंडिया बंगळुरू इथं होणाऱ्या अखेरच्या वन-डेत धडाकेबाज विजयाची नोंद करून सीरिज विजय साजरा करण्यास नक्कीच उत्सुक असणार.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.