अॅडलेड टेस्ट: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ विकेट ३५४

अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ विकेट गमावत ३५४ रन्स केलेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) आणि स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.

Updated: Dec 9, 2014, 02:35 PM IST
अॅडलेड टेस्ट: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ विकेट ३५४ title=

अॅडलेड: अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ विकेट गमावत ३५४ रन्स केलेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) आणि स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.

रॉजर्स (९), वॉटसन (१४), वॉर्नर (१४५), मार्श (४१),लियॉन (३) आणि हॅडिन (०) रनवर आऊट झाले तर कॅप्टन मायकेल क्लार्कचं पाठीचं दुखणं पुन्हा उफाळून आल्यानं तो ६० रन्सवर खेळत असतानाच तंबूत परतला. तर स्मिथ  ७१ रन्सवर नॉट आऊट असून त्यानं ऑस्ट्रेलियाचा धावफलक हलता राहील याची काळजी घेतली. भारतातर्फे शमी आणि अ‍ॅरॉननं प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर , कर्ण शर्मा आणि इशांत शर्मानं प्रत्येकी १ बळी टिपला. 

डेव्हिड वॉर्नरनं २५३ चेंडूत १४५ धावांची शानदार खेळी केली. बाऊंसर लागून मृत्यूमुखी पडलेला ऑस्ट्रेलियाचा खेलाडू फिलीप ह्युजला त्यानं त्याचं शतक अर्पण केलं. 

दरम्यान सामन्याच्या सुरूवातीस दोन्ही संघातील खेळाडूंनी फिल ह्युजला  श्रद्धांजली वाहिली. अ‍ॅडलेड ह्युजचं दुसरं घर होतं. त्याला श्रद्धांजली वाहताना मैदानावरील अतिशय भावपूर्ण बनलं होतं.
दोन आठवडय़ांपूर्वी इथं दाखल झालेला भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पहिली टेस्ट मॅच खेळत आहे. महेंद्रसिंग धोनी अद्याप अंगठय़ाच्या दुखापतीतून सावरलेला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.