सचिन-सेहवागनंतर... रोहीतची डबल सेन्चुरी!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे श्रृंखलेच्या सातव्या मॅचमध्ये रोहीत शर्माची तुफानी खेळी क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. शनिवारी, खेळताना सिक्स आणि फोरची बरसात करत रोहितनं डबल सेन्चुरी ठोकलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 2, 2013, 11:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे श्रृंखलेच्या सातव्या मॅचमध्ये रोहीत शर्माची तुफानी खेळी क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. शनिवारी, खेळताना सिक्स आणि फोरची बरसात करत रोहितनं डबल सेन्चुरी ठोकलीय.
रोहीतनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सेहवागचं डबल सेन्चुरीचा रेकॉर्ड तोडलाय. वन डे मॅचमध्ये डबल सेन्चुरी ठोकणारा रोहीत हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरलाय. १५८ बॉलमध्ये २०९ रन्स झळकावले.
रोहित शर्मानं चिन्नास्वामी स्टेडियमवर कांगारु बॉलर्सची अक्षरक्ष: कत्तल केली. रोहित नावाचं वादळ असं काही घोंगावलं की त्याच्या धडाक्यासमोर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी सपशेल लोटांगण घातलं. मुंबईकर रोहितनं सेंच्युरी झळकावल्यानंतर असा काही गिअर चेंज केला की, कांगारु फिल्डर्सना बॉल सीमापार जातांना पाहण्यावाचून गत्यंततर नव्हतं. जयपूर वन-डेचा ऍक्शन रिप्लेचा बंगळुरुमध्येही पाहिला मिळालं. ऑस्ट्रेलियन बॉलर्स रोहितला बॉलिंग टाकत होते आणि तो बॉल सीमापार धाडण्याचं काम इमाने-इतबारे पार पाडत होता. त्यानं बेलीच्या टीमच्या बॉलर्सचा यथेच्छ समाचार घेतला. रोहितची बॅट चांगलीच तळपली आणि त्यानं वन-डे क्रिकेटमध्ये आपली पहिली-वहिली डबल सेंच्युरी झळकावली. त्याच्या डबल धमाक्यामुळे चिन्नास्वामीवर फटाक्यांच्या आतषबाजीऐवजी फोर-सिक्सर्सची आतषबाजी क्रिकेटप्रेमींना पाहयला मिळली.
भारतानं ५० ओव्हरमध्ये ३८३ रन्स बनवून ऑस्ट्रेलियासमोर ३८४ रन्सचं टार्गेट ठेवलं. यामध्ये सलामीला उतरलेल्या रोहीत शर्मानं वन डेमध्ये सलग ‘सर्वाधिक छक्के’ ठोकण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर नोंदवलाय. या खेळीत त्यानं १६ सिक्स आणि १२ फोर ठोकून २०९ रन्सचा भरभक्कम पाया रचला.
रोहितची ही इनिंग अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण ठरली. त्यानं या इनिंगमध्ये शेन वॉटसनचा १५ सिक्सचा रेकॉर्डही मोडित काढला. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागनंतर डबल सेंच्युरी झळकावणार तो तिसरा क्रिकेटर ठरला. सचिन तेंडुलकरनही आपला शंभर सेंच्युरीचा रेकॉर्ड विराट कोहली आणि रोहित शर्मा मोडेल असा विश्वास व्यक्त केला होता. रोहित शर्मानं बंगळुरुमध्ये अविस्मरणीय इनिंग खेळत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. आता रोहितकडून अशाच कामगिरीची अपेक्षा टीमला असणार आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनंही रोहितला चांगली साथ दिली. धोनीनं ३८ बॉलमध्ये ६२ रन्स केले आणि शेवटच्या बॉलवर आऊट झाला. तर शिखर धवननं ६० रन्स आणि सुरेश रैनानं २८ रन्स ठोकले. विराट कोहली मात्र आज भोपळाही न भोडता आऊट झाला तर युवराज सिंगनं १२ रन्स दिले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.