assembly 2014

गोपीनाथ मुंडेंची दुसरी कन्या लोकसभेची उमेदवार

बीड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम खाडे मुंडे याच भाजपच्या उमेदवार असणार आहेत. 

Sep 17, 2014, 07:35 PM IST

अमित शाह आज मुंबईत

भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा राज्यातला तीन दिवसांचा दौरा दोन दिवसांचा करण्यात आलाय. ते आज मुंबईत दाखल होणार आहेत. 

Sep 17, 2014, 10:31 AM IST

भाजपकडून धार्मिक तेढ, सामाजिक ऐक्याला सुरुंग - पवार

भाजप धार्मिक तेढ निर्माण करत असून सामाजिक ऐक्याला सुरूंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

Sep 16, 2014, 09:29 PM IST

मुख्यमंत्री चव्हाण यांची कोणी केलेय कोंडी?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रसची निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मात्र खुदद् पृथ्वीराज बाबांना कुठल्या मतदारससंघातून निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी दक्षिण कराडमधून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र तिथे स्वपक्षाबरोबरच, मित्रपक्ष आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे कोंडी केली आहे.

Sep 16, 2014, 08:30 PM IST

'महामुख्यमंत्री कोण?' – पृथ्वीराज चव्हाणांच्या कारभाराचा आढावा

यंदाच्या निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा सर्वाधिक पणाला लागली असेल तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची... आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आणायचं आणि विरोधकांवर मात करत, पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवायचं, अशी अडथळ्यांची शर्यत त्यांना पार करायचीय... 'महामुख्यमंत्री कोण?' या आमच्या विशेष सीरिजमध्ये पृथ्वीबाबांच्या कारभाराचा आढावा...

Sep 15, 2014, 08:59 PM IST

'छत्रपती कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही'- फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा खणखणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय. झी २४ तासला दिलेल्या  खास मुलाखतीत फडणवीसांनी स्पष्ट केलंय.   

Sep 15, 2014, 07:59 PM IST

भाजपच्या जास्त जागांचा आग्रह शिवसेनेनं मान्य करावं – पवार

 लोकसभा निवडणुकीचा विधानसभेवर परिणाम होणार नाही असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधानसभा निवडणुकांचा प्रचार शुभारंभ आज कोल्हापूर इथल्या गांधी मैदानातून झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 

Sep 15, 2014, 07:06 PM IST

मुख्यमंत्री आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे

सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनलं असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसं काहीसं राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचं झालं असल्याचं' लेखात म्हटलं आहे. 

Sep 15, 2014, 05:11 PM IST

नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार

नारायण राणे कुडाळमधून निवडणूक लढवणार आहेत. खुद्द नारायण राणेंनीच ही माहिती दिलीय. तसंच कणकवलीमधून नितेश राणेंचा एकमेव अर्ज आल्याचंही राणेंनी म्हटलंय. १७ सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहितीही राणेंनी दिलीय.

Sep 14, 2014, 09:25 PM IST

मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच निवडणूक लढतील?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार, याबाबत चर्चा रंगली असताना त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी मुख्यमंत्री दक्षिण कराड मधूनच लढतील असे संकेत दिलेत. 

Sep 14, 2014, 08:51 PM IST

2009च्या निवडणुकीत मिळालेलं मतदान आणि टक्केवारी

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं वेळापत्रक आज अखेर निवडणूक आयोगानं जाहीर केलं. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, याआधीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा जिंकता आल्या होत्या. त्याची काय आहे टक्केवारी, याचा एक रिपोर्ट.

Sep 12, 2014, 08:33 PM IST

निवडणुका जाहीर : राज्यात विभागवार काय आहे पक्षीय बळाबळ

महाराष्ट्र आणि हरियाणात एकसाथ आणि एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १५ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, याआधीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला विभागवार किती जागा मिळाल्या होत्या. याचा एक रिपोर्ट.

Sep 12, 2014, 08:12 PM IST

महाराष्ट्र, हरियाणा राज्याच्या निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीची आज घोषणा झाली. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरला निवडणूक तर हरियाणात २७ ऑक्टोबरला होणार आहे.

Sep 12, 2014, 04:46 PM IST

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. भाजप नेते पाचपुतेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावरचे आरोप नाहीसे कसे झाले असा खोचक सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केलाय.

Sep 6, 2014, 11:39 AM IST