assembly 2014

योग्य निर्णय दिलाय, आता त्यांनाच घ्यायचाय - उद्धव

 युतीबाबत भाजप निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी  शिवसेनेच्या कोर्टात असल्याचे सांगून त्यांनाच निर्णय घ्याचाय असे स्पष्ट केले. त्यानंतर उद्धव यांनी निर्णयाचा चेंडू भाजपकडे भिरकावून लावला. आपल्याला निरोप नाही. 'मातोश्री'वर कोणतेही बैठक होणार नसल्याचे स्पष्ट करत सेनेने योग्य निर्णय दिलाय. त्यावर त्यांनाच निर्णय घ्यायचा आहे, उद्धव म्हणालेत.

Sep 19, 2014, 11:12 PM IST

युती कायम राहणार - सेना, निर्णयाचा चेंडू सेनेकडे - भाजप

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्दा अजूनही कायम आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप युती कायम राहणार असल्याची माहिती शुक्रवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. दरम्यान, आम्ही युतीबाबत निर्णयचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Sep 19, 2014, 09:04 PM IST

भाजपची युती तोडण्याची भाषा, मित्र पक्षांची धावपळ

'झी २४ तास'नं युती तुटल्याचं वृत्त दाखवल्यानंतर राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली. महायुतीच्या नेत्यांचीही धावपळ सुरू झाली. युती टिकावी अशीच भूमिका घेतल्याचं भाजप सांगत असलं तरी युती तोडण्याची प्रस्तावनाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

Sep 19, 2014, 06:44 PM IST

आता, द्यावा लागेल मद्यविक्रीचा दररोजचा हिशोब

निवडणूक काळात पैसे, दारुविक्रीवर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. निवडणुकीत पैसे, दारुचा मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं निदर्शनास येत असल्यामुळे निवडणूक आयोगानं यासंदर्भातले कायदे अधिकच कडक केलेत.

Sep 19, 2014, 04:22 PM IST

युुती टिकावी, आम्ही संयम पाळलाय - सुधीर मुनगंटीवार

युती कायम राहावी, ही भाजपची इच्छा आहे. नेहमी शिवसेनेने एनडीए विरोधात भूमिका घेतली तरी भाजपने समजदारीची भूमिका घेतली आहे. भाजपने संयमाची भूमिका घेत युती टिकविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत  पत्रकार परिषदेत दिली.

Sep 19, 2014, 04:00 PM IST

महायुतीत फूट नुकसानकारक - विनायक मेटे

महायुतीत फूट नुकसानकारक - विनायक मेटे

Sep 19, 2014, 12:51 PM IST