assembly 2014

दिल्ली तुमची, महाराष्ट्रात सत्ता आमचीच - शिवसेना

 शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातूनही शिवसेना-भाजप युतीच्या फुटीचे सूतोवाच करण्यात आलेत. दिल्ली तुमची, महाराष्ट्रात सत्ता आमचीच या मथळ्याखाली आलेल्या वृत्तात शिवसेनेकडून युती संपल्याचे सूतोवाच करण्यात आलेत.. 

Sep 22, 2014, 08:48 AM IST

महायुती जवळपास संपुष्टात, आज माथूर घेणार उद्धव ठाकरेंची भेट

महायुती जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. आज भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओम माथूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. युती तुटण्याबाबत झी २४ तासने 69 तासांपूर्वीच मांडलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे. 

Sep 22, 2014, 08:37 AM IST

भाजपच्या १३० उमेदवारांची यादी निश्चित?

भाजपच्या १३० उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे.  तसेच १५० पेक्षा जास्त जागांवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपच्या १३० उमेदवारांची ही यादी भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यादी जाहीर करण्याचे अधिकार अमित शहा यांच्याकडे असल्याचं सांगण्यात येतंय.

Sep 21, 2014, 11:37 PM IST

जानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत

महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील. 

Sep 21, 2014, 03:27 PM IST

पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल - विनोद तावडे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नवीन आणि अंतिम प्रस्तावानंतर भारतीय जनता पक्षानं दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिलीय. पुढील २४ तासांत युतीविषयी निर्णय घेतला जाईल आणि प्रत्यक्ष भेटूनच उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. 

Sep 21, 2014, 02:47 PM IST

शिवसेनेचा भाजपला अखेरचा प्रस्ताव, १५१-११९-१८चा नवा फॉर्म्युला

मुंबई- एका महिन्यात महाराष्ट्रात भगवी दिवाळी साजरी करणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. भाजपला अखेरचा प्रस्ताव आणि फॉर्म्युला शिवसेनेनं दिलाय. भाजपला ११९ पूर्ण जागा लढता याव्यात म्हणून ९ ज्यादा जागा आपल्या कोट्यातून देण्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. यानुसार आता शिवसेना १५१, भाजप ११९ आणि इतर घटक पक्ष १८ जागा अशा हा फॉर्म्युला आहे. 

Sep 21, 2014, 12:25 PM IST

विधानसभा २०१४: राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा

 राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

Sep 21, 2014, 10:26 AM IST