assembly 2014

दोन्ही काँग्रेस आघाडीबाबत आज चर्चा - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीकडे असलेल्या ११४ जागांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. तसंच आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत राष्ट्रावादी काँग्रेस सोबत बैठक घेऊन आघाडीबाबत महत्त्वाची भूमिका घेणार असल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. 

Sep 23, 2014, 08:24 AM IST

'चर्चेसाठी आदित्य ठाकरेला पाठवणं अयोग्य'

'चर्चेसाठी आदित्य ठाकरेला पाठवणं अयोग्य'

Sep 22, 2014, 08:47 PM IST

'युती तुटण्यामागे पवारांचा हात?'

'युती तुटण्यामागे पवारांचा हात?'

Sep 22, 2014, 08:46 PM IST

'पोपट मेलाय...' खडसेंनी दिला झी 24 तासच्या वृत्ताला दुजोरा

'पोपट मेलाय...' खडसेंनी दिला झी 24 तासच्या वृत्ताला दुजोरा

Sep 22, 2014, 08:45 PM IST

हीच ती वेळ...हाच तो क्षण

 मला राजकारण माहित नाही, कळत नाही किंवा राजकारणात रस नाही असं म्हटलं तरी महायुतीत आज जे काही घडतंय ते पहाता, हे असं घडेल अशी सुतरामही शक्यता निदान माझ्या सारख्या पत्रकाराला

Sep 22, 2014, 08:29 PM IST

महायुती टिकेल असं वाटत नाही – एकनाथ खडसे

‘सध्याची परिस्थिती पाहता शिवसेना-भाजप युती राहिल असं वाटत नाही’, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ‘झी 24 तास’च्या रोखठोक कार्यक्रमात केलं. यामुळे, ‘झी 24 तास’नं तीन दिवसांपूर्वी दिलेल्या युती तुटल्याच्या वृत्तावर खडसे यांनी शिक्कामोर्तबच केलंय.  

Sep 22, 2014, 08:00 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर पुणे काँग्रेसमध्ये बंडखोरीचे बिगुल

निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीचे बिगुल वाजायला सुरुवात झालीय. पुण्यात शिवाजीनगरमध्ये विद्यमान आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी काँग्रेसमधले निष्ठावंत एकवटले आहेत. निम्हणांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात बंडखोरी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिलाय. 

Sep 22, 2014, 05:41 PM IST

राष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश

राष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश

Sep 22, 2014, 04:44 PM IST

राष्ट्रवादीला डबल हादरा, सावकारे, कथोरेंचा भाजप प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसला आज डबल हादरा बसलाय. राष्ट्रवादीचे भुसावळचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले संजय सावकारे यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय. तसंच मुरबाडचे राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनीही आज भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय. 

Sep 22, 2014, 04:40 PM IST

युती टिकविण्यासाठी अमित शहांचा फोन आलाच नाही - शिवसेना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युती टिकविण्यासाठी फोन केल्याचे सांगण्यात आले. मात्र, शिवसेनेने या वृत्ताचा इन्कार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांना असा कोणताही फोन आलाच नाही, असे म्हटले आहे.

Sep 22, 2014, 12:46 PM IST

शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय - फडणवीस

आता यापुढे शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय झालाय आहे. त्यामुळे सेनेशी चर्चा करणार नाही, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्यामुळे  २५ वर्षांची अभेद्य युती संपुष्टात आली आहे. केवळ घोषणा होण्याचे बाकी आहे.

Sep 22, 2014, 11:55 AM IST

युतीबाबत उद्धव ठाकरेंशी अमित शहांची फोनवर चर्चा

शिवसेना-भाजप युती तुटत असतांनाच  भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी  उद्धव यांना युती टिकवण्याचं आवाहन केले आहे.

Sep 22, 2014, 11:29 AM IST

उद्धव यांची माथूर ऐवजी फडणवीस घेणार भेट

राज्यातील महायुतीतील गुंता अधिकच वाढला आहे. गेल्या २५ वर्षांतील युती तुटीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी ओम प्रकाश माथून हे आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, यात बदल करण्यात आला असून प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ठाकरे यांची भेट घेणार आहे.  परंतु शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. युतीवाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.

Sep 22, 2014, 10:38 AM IST

काँग्रेसची आज पहिली यादी, राष्ट्रवादी कोअर कमिटीची बैठक

 काँग्रेसची सोमवारी पहिली यादी जाहीर होणार तर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीचीही आज बैठक होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दक्षिण कराडमधून उमेदवारी मागितली आहे. 

Sep 22, 2014, 09:03 AM IST