Udaipur Royal family Dispute : राजस्थानमधील उदयपूरमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. दोन राजघराण्यांमुळे हा तणाव निर्माण झालाय. मेवाड राजघराण्याचे नवे महाराणा विश्वराज धुनी दर्शनासाठी त्यांच्या समर्थकांसह सिटी पॅलेसमध्ये पोहोचले तेव्हा हा गोंधळ पाहिला मिळाला. उदयपूरमध्ये महाराणा प्रताप यांच्या वंशजांमध्ये राज्याभिषेक सोहळ्यावरून वाद सुरू असल्याच पाहिला मिळत आहे. महेंद्रसिंग मेवाड यांचे भाऊ आणि विश्वराज यांचे काका अरविंद सिंग मेवाड यांनी उदयपूरच्या सिटी पॅलेसचे दरवाजे बंद केलं आहेत. चित्तौडगडमध्ये आमदार विश्वराज सिंह मेवाड परंपरेनुसार धुनी दर्शनासाठी उदयपूरला पोहोचले तेव्हा त्यांना प्रवेश दिला गेला नाही. विश्वराज यांच्या समर्थकांनी एकच गोंधळ घातला. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. उदयपूरच्या राजघराण्यातील वादाचे मुख्य कारण काय याबद्दल जाणून घेऊयात.
उदयपूरमध्ये महाराणा प्रताप यांच्या वंशजांमध्ये राज्याभिषेक सोहळ्यावरून गदारोळ पाहिला मिळाला. राजघराण्याचे माजी सदस्य आणि माजी खासदार महेंद्रसिंग मेवाड यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा विश्वराज यांना त्यांच्या समर्थकांनी मेवाड राजघराण्याचे नवे महाराणा मानले होते. चित्तोडमधील फतेह निवास पॅलेसमध्ये सोमवारी राज्याभिषेक सोहळा करण्यात आला. या सोहळ्याला देशभरातील आजी-माजी राजे-महाराजे, माजी जहागीरदार उपस्थितीत होते. मात्र संध्याकाळी उशिरा राज्याभिषेक सोहळ्यावरून वाद निर्माण सुरु झाला. महेंद्रसिंग मेवाड यांचे भाऊ आणि विश्वराज यांचे काका अरविंद सिंग मेवाड यांच्या कुटुंबाने त्यांना परंपरा चालवण्यापासून रोखण्यासाठी उदयपूरच्या सिटी पॅलेसचे दरवाजे बंद केले.
दुसरीकडे चित्तोडगडमधील राज्याभिषेक सोहळ्यानंतर विश्वराज सिंह मेवाड परंपरेनुसार धुनी दर्शनासाठी उदयपूरला पोहोचले, मात्र सिटी पॅलेसच्या मार्गावर त्यांना बॅरिकेड्स आढळले. विश्वराज यांच्या समर्थकांनी बॅरिकेड्स हटवले. 3 वाहने राजवाड्यात घुसल्या. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करावा लागला. कलेक्टर आणि एसपी विश्वराज सिंह मेवाड यांच्याशी त्यांच्या कारमध्ये बसून सुमारे 45 मिनिटं बोलले पण एकमत होऊ शकलं नाही. मेवाडचे विश्वराज आणि त्यांचे समर्थक धुनीचे दर्शन घेण्यावर ठाम आहेत.
राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाच्या घोषणेसोबतच विश्वराज सिंह मेवाड हे राज्याभिषेकानंतर धुनी दर्शनासाठी सिटी पॅलेसमध्ये जाणार असल्याची घोषणा कार्यक्रमाच्या आयोजकांनी केली. पण सिटी पॅलेस अरविंद सिंग मेवाडच्या ताब्यात आहे. अरविंद सिंग मेवाड हे महाराणा मेवाड चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. विश्वराज सिंह सिटी पॅलेस ट्रस्टचे सदस्य नाहीत, त्यामुळे त्यांना सिटी पॅलेसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी जाहीर सूचना अरविंद सिंग मेवाड यांनी प्रसिद्ध केली. मात्र राज्याभिषेकानंतर विश्वराज सिंह त्यांच्या समर्थकांसह धुनी दर्शनासाठी सिटी पॅलेसमध्ये पोहोचले. समर्थकांनी सिटी पॅलेसचे बॅरिकेडिंग हटवले.
खरंतर मेवाडचे महाराणा स्वतःला एकलिंगजींचे दिवाण मानतात. या मंदिरात मेम दर्शनाला गेल्यावर महाराणाची काठी पुजारी सुपूर्द करतात, म्हणजे नियमाची काठी. एकप्रकारे महाराणाची ओळख या मंदिरातूनच करण्यात येते. विश्वराज सिंह यांना चित्तोडमध्ये राज टिळक यांच्यानंतर मंदिरात जायचे होतं. एकलिंगजी मंदिर देखील याच ट्रस्टच्या अंतर्गत आहे, म्हणून अरविंद सिंह मेवाड यांनी विश्वराज यांच्या मंदिरात प्रवेशावर बंदी घातली आणि बॅरिकेडिंग लावले.
महाराणा प्रतापानंतर मेवाड राजघराण्यात 19 महाराणा झाले. 1930 मध्ये भूपाल सिंह मेवाडचे महाराणा बनले. 1955 मध्ये भूपाल सिंह यांच्या मृत्यूनंतर भागवत सिंह मेवाडचे महाराणा घोषित करण्यात आले. ते मेवाडचे शेवटचे महाराणा होते. भागवत सिंह यांना दोन मुलगे आणि एक मुलगी होती. ज्येष्ठ महेंद्रसिंग मेवाड, धाकटा मुलगा अरविंदसिंग मेवाड आणि मुलगी योगेश्वरी. महेंद्रसिंग हे मेवाडचे विश्वराज सिंह यांचे पुत्र आहेत. विश्वराज हे नाथधारामधील भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी महिमा कुमारी राजसमंदमधून भाजपच्या खासदार आहेत. धाकटा मुलगा अरविंद सिंग याला एक मुलगा लक्ष्यराज सिंह आहे.
Udaipur royal coronation controversy escalates! Vishvaraj Singh Mewar attacked with stones during the coronation ceremony. #Udaipur #Rajasthan #VishvarajSinghMewar pic.twitter.com/ZChlmLI502
— Jaipur Explore (@JaipurExplore) November 25, 2024
महाराणा भागवत सिंह यांच्या हयातीतच मालमत्तेचा वाद सुरू झाला होता. जेव्हा भागवत सिंह यांनी वडिलोपार्जित मालमत्ता, लेक पॅलेस, जग मंदिर, जग निवास, फतेह प्रकाश महल, सिटी पॅलेस म्युझियम, शिव निवास विकणे आणि भाड्याने देण्यास सुरुवात केली. तेव्हा मोठा मुलगा महेंद्रसिंग मेवाड याने वडिलांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणात महेंद्रसिंग मेवाड यांनी वडिलोपार्जित मालमत्तेची हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार समान विभागणी करावी, अशी मागणी केली होती.
खरंतर प्रोइमोजेनिटल कायद्याचा नियम स्वातंत्र्यानंतर करण्यात आला. मोठा मुलगा राजा होईल आणि सर्व संपत्ती त्याचीच असेल असा नियम होता. पण मोठा मुलगा महेंद्रसिंग यांच्यावर भागवत सिंह नाराज होते. त्यांना त्यांचा धाकटा मुलगा अरविद सिंगला आपला उत्तराधिकारी बनवायचा होता. म्हणजे सर्व मालमत्ता अरविंद सिंग यांच्या मालकीची असेल.
भागवत सिंह यांनी कोर्टात उत्तर दिलं की, सर्व संपत्तीची विभागणी करता येणार नाही, ती अविभाज्य आहे. भागवत सिंह यांनी 15 मे 1984 रोजी त्यांच्या मृत्युपत्रात त्यांचा धाकटा मुलगा अरविंद सिंग याला त्यांच्या मालमत्तेचा एक्झिक्युटर बनवले. याआधी भागवत सिंह यांनी महेंद्रसिंग मेवाड यांना ट्रस्ट आणि मालमत्तेतून वगळलं.
भागवत सिंह यांचं 3 नोव्हेंबर 1984 मध्ये निधन झालं. मग मेवाडच्या बहुतेक सरंजामदारांनी त्याचा मोठा मुलगा महेंद्रसिंग याला मेवाडच्या गादीवर बसवले आणि त्याला महाराणा घोषित केलं. तेव्हापासून महेंद्रसिंग आणि अरविंद सिंग हे दोघेही मेवाडमध्ये स्वत:ला महाराणा मानत आहेत.
1. राजघराण्याचा राजेशाही आणि राजवाडा शंभू निवास
2. बडी पाल
3. घास घर
2020 मध्ये 37 वर्षांनंतर न्यायालयाने या संपत्तीच्या वादात धक्कादायक निर्णय दिला. महेंद्रसिंग अरविंद आणि बहीण योगेश्वरी यांचा शंभू निवासावर समान हक्क होता. तिघांनाही तेथे चार वर्षे राहण्याचा अधिकार देण्यात आला. नंतर अरविंद सिंग यांच्या याचिकेवरून या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली.