विराट ब्रँड एंडोर्समेंट्सचाही King, शाहरुख- दीपिकाला सोडलं मागे, कमाईचा आकडा पाहून डोळे फिरतील

Virat Kohli Brand Endorsements : भारतातील क्रिकेटर्सनी ब्रँड एंडोर्समेंट्समधून होणाऱ्या कमाईच्या बाबतीत बॉलिवुडच्या मोठमोठ्या सेलिब्रिटींना देखील क्रिकेटर्स मागे सोडत आहेत. 

पुजा पवार | Updated: Nov 27, 2024, 12:44 PM IST
विराट ब्रँड एंडोर्समेंट्सचाही King, शाहरुख- दीपिकाला सोडलं मागे, कमाईचा आकडा पाहून डोळे फिरतील title=
(Photo Credit : Social Media)

Virat Kohli Brand Endorsements : भारतात क्रिकेट आणि ते खेळणाऱ्या क्रिकेटर्सची लोकप्रियता केवढी मोठी आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. बॉलिवूड स्टार्सपेक्षा क्रिकेट स्टार्सची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळेच आता भारतातील क्रिकेटर्सनी ब्रँड एंडोर्समेंट्समधून होणाऱ्या कमाईच्या बाबतीत बॉलिवुडच्या मोठमोठ्या सेलिब्रिटींना देखील क्रिकेटर्स मागे सोडत आहेत. 

हंसा रिसर्चमधून समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार भारतात ब्रँड एंडोर्समेंट्सच्या बाबतीत क्रिकेटर्स हे अग्रगण्य आहेत. विराट कोहली हा ब्रँड एंडोर्समेंट्सच्या बाबतीत भारतातील सर्वात टॉपचा सेलिब्रिटी असून त्याच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर एम एस धोनी तर तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. हे तीन दिग्गज क्रिकेटर्स त्यांची लोकप्रियता,  क्रेडिबिलिटी आणि मास अपील इत्यादी कारणांमुळे ब्रांड एंडोर्सच्या टॉप 3 पैकी एक आहेत. तर शाहरुख खान नंबर 4 वर तर दीपिका पादुकोण नंबर 10 वर आहे.   

ब्रँड एंडोर्समेंटसाठी सर्वाधिक मागणी असलेले टॉप 10 सेलिब्रिटी : 

1. विराट कोहली 
2. एम एस धोनी 
3. सचिन तेंडुलकर
4. शाहरुख खान 
5. अक्षय कुमार 
6. अमिताभ बच्चन 
7. अल्लू अर्जुन 
8. सलमान खान 
9. हृतिक रोशन 
10. दीपिका पादुकोण

हेही वाचा : काय ते नशीब! अर्जुनला पाहून सर्व संघांनी नाक मुरडलं; कोणीही खरेदी करेना, अखेर...

 

कोहली का बनला नंबर 1 चा ब्रँड ॲम्बेसेडर  : 

समोर आलेल्या रिपोर्टमध्ये विराट कोहली हा ब्रँड एंडोर्समेंट्सच्या बाबतीत भारतातील सर्वात टॉपचा सेलिब्रिटी ठरला आहे. विराटच्या आधुनिक, युवकांना आकर्षित करणारा, आत्मविश्वासी, आकांक्षी या गुणधर्मांमुळे कोहलीने जाहिरात करू इच्छिणाऱ्या कंपन्यांसाठी प्रथम प्राधान्य असतो. तरुण प्रेक्षकांना लक्ष्य करणाऱ्या ब्रँडसाठी विराट हा एक पसंतीचा पर्याय बनला आहे. 2023 मध्ये सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर जवळपास 500 ते 1000 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

जाहिरातींमधून किती कमावतो विराट? 

विराट कोहली हा अनेक मोठ्या ब्रँडचा चेहरा आहे. यात MRF, PUMA, ऑडी इंडिया, पेप्सी, गूगल डुओ, Myntra , Vivo सारख्या अनेक लहान मोठ्या ब्रँडचा समावेश आहे.  यामधून विराट कोहली वर्षाला बक्कळ कमाई करतो. रिपोर्टनुसार टीम इंडियाचा हा स्टार क्रिकेटर एका ऍड शूटसाठी वर्षाला जवळपास 7.50 से 10 कोटी रुपये घेतो. ब्रँड एंडोर्समेंट्समधून विराट कोहली वर्षभरात जवळपास 175 कोटी रुपयांची कमाई करतो.