भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. भाजप नेते पाचपुतेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावरचे आरोप नाहीसे कसे झाले असा खोचक सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केलाय.

Updated: Sep 20, 2014, 10:12 PM IST
भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश title=

मुंबई : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. भाजप नेते पाचपुतेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावरचे आरोप नाहीसे कसे झाले असा खोचक सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केलाय.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी पिचड यांना तेवढाच जोरदार टोला हाणत आज भाजपमध्ये आलेले तीर्थ लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांना कस चालत होत, असा सवाल उपस्थित केला.

पाचपुते आणि गावित  यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन विधिमंडळाचे कामकाज भाजपने बंद पाडले. हे खरे असले तरी त्यांना अजून न्यायालयाने किंवा चौकशी यंत्रणेने दोषी ठरविलेले नाहीत, असा लंगडा बचाव भाजपने करत त्यांना पक्षात घेतलेय. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना प्रवेश दिला असताना शनिवारी डॉ. विजयकुमार गावीत यांना प्रवेश दिला जाणार आहे. 

या नेत्यांना पक्षाने घेतल्याने पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाचपुते आणि डॉ. गावीत यांच्यावर प्रदेश भाजप नेत्यांनी विधिमंडळात आरोप करुन कारवाईच्या मागणीसाठी कामकाज बंद पाडले होते. त्यांना का पक्षात घेतले, अशी कुजबुज दबक्या आवाजात भाजपमध्ये सुरु आहे.  

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी खासदार भास्करराव खतगावकर, सूर्यकांता पाटील, बबनराव पाचपुते, माधव किन्हाळकर  यांच्यासह स्थानिक नेत्यांना प्रवेश देण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.