राष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असला तरी राष्ट्रवादीला अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळत नाहीयत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्यामुळं या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या घटल्याचं चित्र यावेळी दिसतंय.
Sep 6, 2014, 10:14 AM ISTव्हाट्सअॅपवर 'शहाणा हो...'चे पोस्टर, टोमणा भाजपला
महायुतीतील वादळ आता सोशल मीडियावर रंगू लागले आहे. शिवसेना-भाजप युतीचा विस्तार करताना छोटे पक्ष सोबत घेऊन 'महा'विस्तार करण्यात आला. मात्र, जागा वाटपाबाबतचे घोडे अजून गंगेत न्हाले नाही. याचवेळी भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येत आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर 'शहाणा हो...'चे पोस्टर झळकतेय.
Sep 3, 2014, 07:44 PM ISTमहायुतीत धुसफूस सुरुच, नारायण राणे यांची टीका
आरपीआयनं भाजपकडे 8 जागांची मागणी केलीय. आरपीआयचे नेते अविनाश महातेकर, सुमंत गायकवाड यांनी आज भाजप नेते विनोद तावडेंची भेट घेऊन ही मागणी केलीय. दरम्यान, महायुतीवर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी टीका करताना हल्लाबोल केला.
Sep 3, 2014, 03:47 PM ISTमनसेची बहुचर्चित 'ब्लू प्रिंट' अखेर जाहीर होणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बहुचर्चित ब्लू प्रिंटसाठी पुन्हा एकदा नवीन मुहूर्त जाहीर केला आहे.
Sep 3, 2014, 01:05 PM ISTमहायुती तुटणार? राजू शेट्टी, आठवलेंचा इशारा
जागावाटपाचा तिढा मिटत नसल्यामुळं आरपीआय महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकून येणाऱ्या आणि समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा आरपीआयनं दिलाय.
Sep 2, 2014, 08:38 PM IST'त्या' मुलींचं नाव 'शिवसेना'
कल्पता मांडून शिवसेनेला युट्युबवर प्रमोट करण्याचा प्रयत्न एका युवकाने केलाय. हातगाडी ओढणारे आजोबा विचारतात, मुलीनो तुमचं नाव काय, त्यावर त्या दोघी सांगतात, आमचं नाव शिवसेना.
Sep 2, 2014, 04:25 PM IST''महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दा महत्त्वाचा''
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्दयावर भाजप जिंकणार.
Sep 1, 2014, 04:49 PM ISTमहाेत्सव विधानसभा निवडणुकांचा
अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज झालाय. सण साजरे करतानाच राज्याला वेध लागलेत ते लोकशाहीच्या उत्सवाचे, अर्थात निवडणुकांचे. संस्कृती जपणारे आपले सण आणि लोकशाही घडवणारा निवडणुकांचा उत्सव. यांची एक वेगळी सांगड. मतदारराजासाठी.
Aug 28, 2014, 10:06 AM ISTकाँग्रेस आघाडीबाबत राष्ट्रवादीची सारवासारव
स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडीबाबत काहीशी मवाळ भूमिका घेतली. २८८ जागांच्या मुलाखती म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवणार असा अर्थ होत नाही, अशी सारवासारव राष्ट्रवादीनं केलीये. पुढल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीबाबत अंतिम निर्णय होईल, असंही पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.
Aug 28, 2014, 07:40 AM ISTराज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसे 'कनफ्यूज'
राज ठाकरे स्वत: विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, अजूनही निश्चित नाही.... निवडणुकीबाबतच्या त्यांच्या विधानाचा विपर्यास केल्याचा खुलासा राज यांनी केलाय.... त्यामुळ कनफ्युजनमध्ये आणखी भरच पडलीय.
Aug 26, 2014, 11:54 AM ISTआमदार किसन कथोरेंचाही राष्ट्रवादीला रामराम
आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. किसन कथोरे हे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
Aug 24, 2014, 08:07 PM ISTनीलेश राणेंची भास्कर जाधवांविरोधात माघार
उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागरमधून माघार घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि कामगारमंमत्री भास्कर जाधवांना आव्हान देत निलेश राणेंनी गुहागरमधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती.
Aug 21, 2014, 11:30 PM ISTकोल्हापूर-रत्नागिरीत काँग्रेसला खिंडार, सेनेत आनंद
कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसला खिंडार पडलंय. काँग्रेस नेते आणि कागलचे माजी आमदार संजय घा़डगे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तर राधानगरीच्या प्रकाश आबिटकरही शिवसेनेच्या तंबूत दाखल झाले आहेत. तर रत्नागिरीत सुभाष बने पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.
Aug 21, 2014, 05:43 PM ISTविधानसभा निवडणुकीआधी वातावरण तापले, काँग्रेस-सेनेत हलचल
घोटाळेबाज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारला खाली खेचा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोटीमध्ये केलंय. तर छगन भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केलेय. नवी मुंबईत काँग्रेसचे पदाधिकारी सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.
Aug 20, 2014, 10:47 PM IST‘ब्लू प्रिंट’ ऑगस्टमध्येच सादर करु - राज ठाकरे
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये मनसेच्या ब्लू प्रिंटविषयी बातम्या येत आहेत. मात्र त्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ब्लू प्रिंट कधी येणार हे मी वेळ आल्यावर सांगेन अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. हल्ली प्रसारमाध्यमे वॉट्स अॅणपवरुन बातम्या करतात अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे.
Aug 17, 2014, 06:12 PM IST