युुती टिकावी, आम्ही संयम पाळलाय - सुधीर मुनगंटीवार

युती कायम राहावी, ही भाजपची इच्छा आहे. नेहमी शिवसेनेने एनडीए विरोधात भूमिका घेतली तरी भाजपने समजदारीची भूमिका घेतली आहे. भाजपने संयमाची भूमिका घेत युती टिकविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत  पत्रकार परिषदेत दिली.

Updated: Sep 19, 2014, 04:26 PM IST
युुती टिकावी, आम्ही संयम पाळलाय - सुधीर मुनगंटीवार title=

मुंबई : युती कायम राहावी, ही भाजपची इच्छा आहे. नेहमी शिवसेनेने एनडीए विरोधात भूमिका घेतली तरी भाजपने समजदारीची भूमिका घेतली आहे. आमचा सन्मान राखा. भाजपने संयमाची भूमिका घेत युती टिकविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी युती झाली पाहिजे, अशी आमची भूमिका कायम आहे. ओमप्रकार माथूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत तसा निर्णय झाला आहे. आम्ही आमचा शिवसेनेकडे पाठवणार प्रस्ताव पाठवणार आहे. जागा वाटपाबाबत या गोष्टीवर चर्चा पुढे सुरू राहणार, भाजपची ही भूमिका कायम आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

भाजपने संयमाची भूमिका घेत युती टिकविण्याचा प्रयत्न केला.जेव्हा जेव्हा आम्ही प्रयत्न केला. चर्चा झाली पाहिजे. महायुती टिकावी ही भाजपची ईच्छा आहे. आम्ही किती जागांचा प्रस्ताव दिला आहे, याची काहीही माहिती मीडियालाही देणार नाही. आम्ही थेट शिवसेनेला देणार आहोत, असे सांगत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला इशारा दिलाय. मीडियाच्या माध्यमातून जागा वाटपाचा निर्णय होत नाही. त्यांनी तसे केलेय. मात्र, आम्ही असं काहीही करणार नाही, असे इशारा देताना त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार यांना पंतप्रधान होण्यासाठी पुढाकार घेतला त्यावेळी आम्ही मोठे मन केले. प्रमिभाताई पाटील यांना राष्ट्रपती होण्यासाठी शिवसेनेने भूमिका घेतली आणि पाठिंबा दिला. त्यावेळीही भाजपने सेनेला समजून घेतले. ५९ जागावर शिवसेनेने विजय मिळविलेला नाही. त्यामुळे जागा वाटपाबाबत आम्ही आमचा प्रस्ताव शिवसेनेला दिला आहे. ज्या जागा निवडणून आल्या नाहीत त्यातील काही जागा त्या भाजपला दिल्या पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा, राज्यसभेसाठी भाजपने सात जागा शिवसेनेला सोडल्या. विधानसभेला शिवसेनेने भाजपला अद्याप एकही जागा सोडलेली नाही. भाजप नेहमी त्याग करत आला आहे. आता ते कार्यकर्त्यांना मान्य नाही, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. 

पहिल्यांदा महायुती ठरली तेव्हा भाजप ३५ जागा लढविण्याचे ठरले होते. मात्र, आता शिवसेना २२ आणि भाजप केवळ भाजप २६ जागा लढते. मात्र, ज्या ठिकाणी शिवसेना मागील २५ वर्षांत एकदाही जिंकली नाही अशा ५९ जागांबाबत चर्चा व्हावी, अशी आमची मागणी आहे. या जागा काँग्रेस-राष्ट्रवादी जाण्यापेक्षा भाजपला या ठिकाणी संधी दिल्यास आम्ही येथे जिंकण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.