IND Vs AUS: रोहित शर्मासाठी कोण बलिदान देणार? ऑस्ट्रेलिया मालिकाच्यामध्ये 'या' सामन्यात मिळेल उत्तर

Rohit Sharma:  टीम इंडियाने पहिला सामना 295 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत रोहितच्या पुनरागमनानंतर बलिदान कोण देणार, म्हणजेच प्लेइंग-11 मधून कोणाला वगळले जाणार हा मोठा प्रश्न समोर आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 27, 2024, 11:49 AM IST
IND Vs AUS: रोहित शर्मासाठी कोण बलिदान देणार? ऑस्ट्रेलिया मालिकाच्यामध्ये 'या' सामन्यात मिळेल उत्तर  title=
Photo Credit: PTI

BGT 2024-25: सध्या भारतीय कसोटी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) उपलब्ध नसल्याने जसप्रीत बुमराहने कर्णधाराची कामगिरी केली. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. पण आता कर्णधार रोहित शर्माने पुनरागमन केले आहे. अशा परिस्थितीत, रोहितच्या पुनरागमनानंतर कोण बलिदान देईल, म्हणजेच प्लेइंग-11 मधून कोणाला वगळले जाईल, हा मोठा प्रश्न आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. 

हे ही वाचा: Bajrang Punia: बजरंग पुनियाची कारकीर्द संपली? ऑलिम्पिक पदक विजेत्यावर NADA घातली 4 वर्षांची बंदी

'या' खेळाडूला जावे लागू शकते संघाबाहेर

गेल्या ५ वर्षांपासून कसोटीत डावाची सुरुवात करणारा रोहित त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये सध्या नाही आहे. गेल्या ५ कसोटी सामन्यांमध्येही त्याची कामगिरी चांगली नव्हती. मात्र, हे सर्व सामने फलंदाजीसाठी अवघड खेळपट्ट्यांवर खेळवले गेले हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कसोटी मालिकेपूर्वी शुभमन गिलला वाका येथे सराव करताना बोटाला फ्रॅक्चर झाले होते. याच कारणामुळे तो पहिली कसोटी खेळू शकला नाही. त्याने अद्याप नेटमध्ये सराव सुरू केलेला नाही. गिल दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त झाल्यास कर्णधार रोहितच्या प्रवेशासाठी ध्रुव जुरेलला प्लेइंग-11 मधून बाहेर पडावे लागेल.

हे ही वाचा: IPL लिलावात नवऱ्याला खरेदी न केल्याने संतापली पत्नी, शाहरुखच्या टीमवर काढला राग!

फिरकी विभागात बदल होऊ शकतात

2021 मध्ये देखील, ॲडलेडमध्ये गुलाबी बॉलची कसोटी खेळली गेली, तेव्हा अश्विनने पहिल्या डावात 45 धावांत 4 बळी घेतले होते. पण सध्याची परिस्थिती पाहता ॲडलेडमधील खेळपट्टी फिरकीपटूंना फारशी मदत करणार नाही. दुसरीकडे, जडेजाला परदेशातील त्याच्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावर अश्विनपेक्षा प्राधान्य दिले जात असले तरी तांत्रिकदृष्ट्या वॉशिंग्टन त्याच्यापेक्षा सरस मानला जातो. या डावखुऱ्या फलंदाजाने पर्थमध्ये विराट कोहलीसोबत 89 धावांची भागीदारी करून संघाची आघाडी 500 हून अधिक धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते.