युती कायम राहणार - सेना, निर्णयाचा चेंडू सेनेकडे - भाजप

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्दा अजूनही कायम आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप युती कायम राहणार असल्याची माहिती शुक्रवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. दरम्यान, आम्ही युतीबाबत निर्णयचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Updated: Sep 20, 2014, 02:57 PM IST
युती कायम राहणार - सेना, निर्णयाचा चेंडू सेनेकडे - भाजप title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्दा अजूनही कायम आहे. मात्र, शिवसेना आणि भाजप युती कायम राहणार असल्याची माहिती शुक्रवारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. दरम्यान, आम्ही युतीबाबत निर्णयचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दुपारी भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. त्यावेळी भाजपने शिवसेनेला जवळजवळ इशाराचा दिला. त्यानंतर शिवसेनेने चर्चेची तयारी दाखविली. भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओम माथूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला शिवसेनेतर्फे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई उपस्थित होते. या बैठकीत भाजप नेत्यांशी सकारात्मक स्वरुपाची चर्चा झाल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. 

मात्र, जागावाटपासंदर्भातील अंतिम निर्णय शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि ओम माथूर यांच्यातील शुक्रवारी रात्री 'मातोश्री'वर होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे या बैठकीनंतरच युतीबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
 
याआधी भाजप कोअर समितीच्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जागावाटबाबतचा अधिकृत प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. नेहमी भाजपनंच त्याग का करावा , असा सवाल भाजपनं उपस्थित केला. तसंच भाजपनं नेहमीच संयमाची भूमिका ठेवलीय. त्यामुळं मित्र पक्षानं चूक करू नये, असा इशारा वजा सल्लाही द्यायला भाजप विसरला नाही. 

बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी केलेली युती तुटणार नाही. काँग्रेसमुक्त आणि काँग्रेस भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्णत्वास जाईल, असा विश्वास या बैठकीनंतरआदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा उध्दवजींचे महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होणे महत्त्वाचे आहे . त्यासाठी युती कायम राहावी, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. सोबत 'मिशन १५०+' यामध्ये काहीच बदल होणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.