assembly 2014

महायुतीत फूट ; स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर पडणार!

शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपांचा तिढा सुटत नसल्याने आणि घटक पक्षांना कमी जागा देण्याचा प्रस्ताव आल्याने स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर हे घटक पक्ष बाहेर पडणार आहेत, तसा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी दिली. संध्याकाळी सहा वाजता आमची भूमिक जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतला.

Sep 24, 2014, 02:47 PM IST

'महायुती'चा तिढा सुटला; घटकपक्षांचं 14 जागांवर समाधान

गेल्या कित्येक दिवसांपासून अडलेलं 'फॉर्म्युल्या'चं कोडं रात्री उशीरा का होईना पण सुटल्याची चिन्हं दिसू लागलीत. 

Sep 24, 2014, 10:34 AM IST

अपडेट: आघाडी राष्ट्रवादीलाच तो़डायचीय - राणे

दुपारी ४.३० वाजता - 

आघाडीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार, आघाडी राष्ट्रवादीलाच तोडायची आहे, नारायण राणेंची रोखठोक भूमिका

दुपारी ३.२५ वाजता - 

मुख्यमंत्री कराडहून आल्यानंतर जागावाटपाबाबत बैठक होणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

Sep 24, 2014, 10:05 AM IST

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही: उद्धव

मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे स्पष्टोक्ती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

Sep 23, 2014, 09:31 PM IST

काँग्रेसमध्ये विलिन होणे अशक्य – सुप्रिया सुळे

काँग्रेस पक्षाने पवारसाहेब, तारीकसाहेब आणि संगमा साहेबांना पक्षातून काढले ते बाहेर गेले नव्हते. तुम्हांला तुमच्या घरातून काढले आणि मोठ्या भावाला तुमची आठवण येत असेल तर ते छोट्या भावाला बरे वाटते. पण पुन्हा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विलीन होणे शक्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी झी २४ तासच्या खास कार्यक्रमात सांगितले. 

Sep 23, 2014, 07:41 PM IST

हरतो पण लढतो... १६०व्यांदा निवडणूक आखाड्यात!

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... याच व्यक्तींना कोणतेही छंद असू शकतात. असाच एक छंद जोपासलाय के. पद्मराजन के. कुचुंबा या व्यक्तीनं. त्यांना हौस आहे ती देशातील दिग्गज व्यक्तींविरोधात निवडणूक लढविण्याची.

Sep 23, 2014, 04:20 PM IST

अपडेट : 'महायुती'ची बैठक; आठवले पडले बाहेर

महाराष्ट्रात मजबुत युती कायम राहील. जागावाटपाच्या नव्या प्रस्तावावर महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मंगळवारी संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाईल...

Sep 23, 2014, 01:30 PM IST

बोलणी शिवाय काँग्रेस आघाडीची संपली बैठक

दोन्ही काँग्रेस आघाडीबाबतमधील जागा वाटपांचा घोळ संपविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या  वर्षा बंगल्यावर सुरु असलेली बैठक चर्चेशिवाय संपली. मात्र, आघाडीची बोलणी पुन्हा सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Sep 23, 2014, 11:39 AM IST

युतीबाबत पुन्हा बोलणी, सेना नेते भाजप नेत्यांची घेणार भेट

शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती जागा वाटपावरुन ताणली गेली होती. शिवसेना १५१ जागांवर तर भाजप १३० जागांवर ठाम असल्याने युतीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, जागांच्या अदलाबदल होण्याच्या दृष्टीने विचार होऊ शकतो. त्यासाठी शिवसेना नेते भाजप नेत्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे रुळावरून घसरलेली बोलणी पुन्हा ट्रकवर येत असल्याचे दिसत आहे.

Sep 23, 2014, 11:19 AM IST