भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार पवन सिंहच्या पत्नीची आत्महत्या

भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंह याची पत्नी नीलम सिंहने आज आत्महत्या केलीय. २१ वर्षीय नीलमचं तीन महिन्यांपूर्वी पवनसोबत लग्न झालं होतं. नीलमच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप पोलिसांना कळलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी कोणतंही सुसाइड नोट सापडलं नाही. 

Updated: Mar 8, 2015, 08:09 PM IST
भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार पवन सिंहच्या पत्नीची आत्महत्या title=

मुंबई: भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंह याची पत्नी नीलम सिंहने आज आत्महत्या केलीय. २१ वर्षीय नीलमचं तीन महिन्यांपूर्वी पवनसोबत लग्न झालं होतं. नीलमच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप पोलिसांना कळलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी कोणतंही सुसाइड नोट सापडलं नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार नीलमने आत्महत्या केली तेव्हा पवन सिंह घरी नव्हता. पवन सिंह आणि त्याचा भाऊ एकत्र ओशिवरातील ऑर्किड इमारतीमध्ये राहतो. नीलमनं पंख्याला लटकवून फाशी घेतली. सकाळी पवनच्या भावानं आणि शेजाऱ्यांनी आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली. 

रिपोर्टनुसार पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये नवरा पवन सिंहच्या उशीरा घरी येण्याने ती नाराज होती. फिल्म इंडस्ट्रीमध्ये असल्याने पवनला रात्री उशीरापर्यंत काम करण्याची सवय होती. 

नीलमचं शरीर पोस्टमार्टेमनंतर तिच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल. पवनचं तीन महिन्यांपूर्वी आपला मोठा भाऊ रानू सिंहची मेव्हणी नीलमसोबत लग्न झालं होतं. 

'लॉलीपॉप लागे लू' गीतापासून चर्चेत आलेला पवन सिंह भोजपुरीतील स्टार नायकांमध्ये एक आहे. त्याचे चित्रपट भोजपुरी भागात खूप कमाई करतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.