स्टार्कची विकेट पडताच अनुष्का आणि संजना रोखू शकल्या नाहीत स्वतःला, प्रतिक्रिया होतेय Viral

Anushka Sharma, Sanjana Ganesan: पर्थ येथे झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले आहे.

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 23, 2024, 03:36 PM IST
स्टार्कची विकेट पडताच अनुष्का आणि संजना रोखू शकल्या नाहीत स्वतःला, प्रतिक्रिया होतेय Viral  title=
Photo Credit: X

IND vs AUS BGT: पर्थ येथे सुरु झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याचा आजचा दुसरा दिवस होता. भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियावर मजबूत वर्चस्व राखले आहे. पहिल्या डावात 150 धावा कमी झाल्यानंतर टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत कांगारू संघाला पहिल्या डावात 104 धावांवर रोखले. जसप्रीत बुमराहच्या संघाला 46 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने 2000 नंतर घरच्या मैदानावर तिसरी सर्वात कमी धावसंख्या केली. या सामन्यादरम्यान, भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन देखील स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. 

स्टार्क आणि हेझलवूडची उत्तम खेळी 

 

ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दिवसाच्या धावसंख्येच्या पुढे खेळण्यासाठी आला होता. भारतीय संघाचा डाव त्यांचा लवकर संपुष्टात आणण्याकडे लक्ष लागले होते. टीम इंडियाने झटपट दोन विकेट घेतल्या. मात्र येथून मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी पदभार स्वीकारला. दोन्ही खेळाडूंनी शेवटच्या विकेटसाठी 110 चेंडूत 25 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे भारतीय संघ चांगलाच अस्वस्थ झाला होता. 

हे ही वाचा: W,W,W,W,W... जसप्रीत बुमराहने पर्थ कसोटीत रचला इतिहास! नावावर केले 5 मोठे जागतिक विक्रम

अनुष्का आणि संजनाची प्रतिक्रिया व्हायरल 

ऑस्ट्रेलियाचा संघाला खेळ उत्तम सुरु असतानाच हर्षित राणाने स्टार्कची विकेट मिळाली. यासह हर्षित राणाने टीम इंडियाला दहावे यश मिळवून दिले. यानंतर चाहते आनंदाने नाचू लागले. अनुष्का आणि संजनाही प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला दूर ठेवू शकल्या नाहीत. दोघीही खूप आनंदी  दिसल्या. अनुष्का आणि संजनाने टाळ्या वाजवून उत्सहात प्रतिक्रिया दिली. आता त्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. 

हे ही वाचा: 2 खेळाडूंवर बंदी, 3 जणांवर टाकती तलवार; IPL 2025 च्या लिलावापूर्वी BCCI ची मोठी कारवाई

बघा व्हायरल व्हिडीओ 

 

 

हे ही वाचा: "मी तुमच्यापेक्षा वेगवान आहे..." मिशेल स्टार्कने हर्षित राणाला दिली 'धमकी', बघा Viral Video

 

आतापर्यंतच्या सामन्यात काय घडलं?

 

नवोदित नितीश रेड्डीच्या धाडसी 41 धावा आणि ऋषभ पंतच्या 37 धावांच्या जोरावर भारताने 49.4 षटकांत 150 धावांपर्यंत मजल मारली. जोश हेझलवूड (29 धावांत 4 विकेट), मिचेल स्टार्क (11 षटकांत 14 धावांत 2 बळी), पॅट कमिन्स (15.4 षटकांत 67 धावांत 2 बळी) आणि मिचेल मार्श (5 षटकांत 12 धावांत 2 विकेट) यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली साथ दिली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर नेमके तेच केले. बुमराह, हर्षित आणि सिराज यांनी उत्तम फलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 104 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्याच्यासाठी स्टार्कने सर्वाधिक २६ आणि ॲलेक्स कॅरीने २१ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी टीम इंडियाला 217 धावांची आघाडी मिळाली आहे.