आमिरनंतर आता हृतिक रोशन होणार न्यूड?

आमिर खाननं आपल्या 'पीके' चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये 'न्यूड' होऊन सर्वांना धक्का दिला होता. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेता हृतिक रोशनही चित्रपटात न्यूड होणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या 'मोहन जोदडो' या चित्रपटात हृतिक आपल्याला या अवतारात दिसेल. 

DNA | Updated: Mar 9, 2015, 05:08 PM IST
आमिरनंतर आता हृतिक रोशन होणार न्यूड? title=

मुंबई: आमिर खाननं आपल्या 'पीके' चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये 'न्यूड' होऊन सर्वांना धक्का दिला होता. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेता हृतिक रोशनही चित्रपटात न्यूड होणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या 'मोहन जोदडो' या चित्रपटात हृतिक आपल्याला या अवतारात दिसेल. 

आमिर खाननं पीके चित्रपटात पूर्ण कपडे उतरवले होते. मात्र हृतिक रोशन असं करणार नाहीय, पण आपण आतापर्यंत हृतिकला अशा अवतारात कधीच बघितलं नसेल. 

'मोहन जोदडो'  आपल्याला प्राचीन काळात घेऊन जाईल. तेव्हा मनुष्य अंगावर फक्त खाजगी अंग झाकण्या इतकेच कपडे घालत होते. त्यामुळं हृतिक रोशन यात फक्त तेवढेच कपडे घालून दिसेल. 

काही दिवसांपूर्वी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये डुग्गू म्हणजेच हृतिकनं आपण स्क्रीनवर कधीही न्यूड दिसणार नाही, असं म्हटलं होतं. पण आता कदाचित त्याचं मत बदललेलं दिसतंय. 

तेव्हा आता पाहायचंय खरंच हृतिक या नव्या अवतारात कसा दिसेल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.