मुंबई: मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये माकडांच्या रहस्यमय मृत्यूमुळं एकच खळबळ उडालीय. आतापर्यंत ७ माकडांचे मृतदेह सापडले असून, त्या सातही माकडांचे डोळे गायब असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातयं.
गेल्या महिन्यात नॅशनल पार्कच्या तुलसी तलावाजवळ मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांना एक, दोन नव्हे तर माकडांचे तब्बल सात मृतदेह आढळले. धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या माकडांचे डोळे गायब होते.
माकडांच्या गूढ मृत्यूचं रहस्य शोधून काढण्यासाठी आता चौकशी समिती नेमण्यात आलीय. माकडांचे मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी पाठवण्यात आलेत आणि चौकशी समिती आता फॉरेंसिंग रिपोर्टची वाट पाहतेय... विषप्रयोग करून या माकडांना ठार मारण्यात आलं असावं, असा अंदाज आहे...
या घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित झालेत....
- या माकडांना कोणी आणि का मारलं?
- या माकडांना पार्कच्या आतच ठार मारलं का?
- की बाहेर मारून त्यांना नॅशनल पार्कमध्ये फेकून दिलं?
- माकडांचे नेमके डोळे गायब कसे?
- हा काळ्या जादूचा किंवा अघोरी विद्येचा प्रकार आहे का?
या सर्व बाबींचा शोध वन विभाग घेतंय. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. पण अजून धागेदोरे हाती लागलेले नाहीत. जंगली प्राण्यांनी त्यांचे डोळे ओरबाडले असावेत, अशीही शक्यता आहे. मात्र माकडांच्या या मृत्यूचं रहस्य कधी उलगडणार, याकडं आता सर्वांचे डोळे लागलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.