पर्थ: बॉलिंगमध्ये गति मिळण्याचं श्रेय शोएब अख्तरला देत भारतीय फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं म्हटलं की, पाकिस्तानच्या या दिग्गज बॉलरनं त्याला रन अप छोटा घेण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळं त्याला आपली गति वाढनिण्यासाठी मदत मिळाली.
शमीनं मॅचनंतर सांगितलं, 'नुकताच रन अपमध्ये बदल केल्यानं माझा स्पीड वाढलाय. म्हणून मी ते कायम ठेवलं आणि याचा मला पुढेही फायदा होईल अशी अपेक्षा करतो. मी शोएब अख्तर भाई सोबत बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की, मला लांब पाऊलं टाकणं थांबवावं लागेल. मी पाऊलांमधली गती कमी केली आणि याचा मला फायदा झाला. नवा रन अप सहज आहे आणि यामुळं माझी गति वाढण्यात मदत झालीय.'
दुखापतीनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या खेळीत परत येणाऱ्या शमीनं तीन विकेट घेतल्या ज्यामुळं भारत सलग चौथ्यांदा विजयी होऊन पूल बीमध्ये अव्वल ठरला. भारतानं क्वार्टर फायनलमध्ये आपली जागा निश्चित केलीय. भारतीय टीमला आता पुढल्या दोन मॅच न्यूझिलंडमध्ये खेळायच्या आहेत. शमी आपल्या अॅक्शनमध्ये कोणताही बदल न करता चांगली कामगिरी करू इच्छितोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.