लोकप्रिय 'नोकिया ११००' येतोय नव्या अवतारात

जगातिल सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल हँडसेट नोकिया ११०० पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च होऊ शकतो. बेंचमार्कची टेस्ट रिपोर्ट लीक झाल्यानं माहिती मिळालीय की, अँड्रॉइड लॉलीपॉप ५.० ऑपरेटिंग सिस्टिमसह नोकिया ११०० बाजारात येऊ शकतो. 

Updated: Mar 8, 2015, 07:00 PM IST
लोकप्रिय 'नोकिया ११००' येतोय नव्या अवतारात title=

मुंबई: जगातिल सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल हँडसेट नोकिया ११०० पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च होऊ शकतो. बेंचमार्कची टेस्ट रिपोर्ट लीक झाल्यानं माहिती मिळालीय की, अँड्रॉइड लॉलीपॉप ५.० ऑपरेटिंग सिस्टिमसह नोकिया ११०० बाजारात येऊ शकतो. 

गीकबेंच बेचंमार्क रिझल्टद्वारे माहिती मिळालीय की, हा हँडसेट अँड्रॉइड ५.० लॉलीपॉपसह आणि यात क्वाडकोर मीडियाटेक (MT6582) प्रोसेसर लागलाय. नोकिया ११०० हँडसेटमध्ये ५१२ एमबी रॅम आहे.

नोकिया ११००, २००३मध्ये लॉन्च झाला होता. लॉन्च झाल्यानंतर लगेच हा फोन सर्वाधिक लोकप्रिय ठरला. हा फोन जगभरात २५ कोटी व्यक्तींनी वापरल्याचा दावा कंपनीनं केलाय. स्मार्टफोन आल्यानंतर हा हँडसेट मार्केटमधून गायब झाला. मात्र लवकरच नव्या रुपात येऊन पुन्हा एकदा धूम माजविण्यासाठी नोकिया ११०० तयार असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.