असं असेल मोदींचं `ड्रीम कॅबिनेट`?
2014च्या निवडणुका झाल्यायत आणि आता लक्ष लागून राहिलंय ते १६ मेकडे... कुणाचं सरकार येणार, दिल्लीचं तख्त कुणाचं याचा फैसला शुक्रवारी होणार आहे. पण सगळ्या एक्झिट पोलचे आकडे एनडीएच्या बाजूनं झुकलेले आहेत. एकंदरीतच देशाचा मूड पाहता अब की बार मोदी सरकार.... हे सध्याच्या घडीला तरी खरं वाटतंय.
May 14, 2014, 11:03 AM IST१५० पोलीस अॅण्टी करप्शनच्या सापळ्यात
सरकारी विभागातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी अॅण्टी करप्शन विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांपेक्षा लाचखोर पोलीस पहिल्या स्थानावर आहेत.
May 13, 2014, 07:26 PM ISTपोलिसांकडून `थर्ड डिग्री`चा वापर, सरकारच्या अंगाशी
माहिती काढून घेण्यासाठी `थर्ड डिग्री`चा वापर करताना आता पोलिसांना जरा सावधच राहावं लागणार आहे.
May 4, 2014, 04:31 PM ISTसरकारची मदत तुटपुंजी, शेतकरी संतापले
खूप वाट पहायला लावून अखेर सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं. पण हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असून या मदतीतून साधा बियाणांचा खर्चही निघणार नाही, मग मशागत, खते, औषधे, मजुरी यांचा खर्च तर दूरच, आमची अशी चेष्टा का करता असा संतप्त सवाल राज्यभरातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत.
Mar 20, 2014, 04:42 PM ISTशिवाजी महाराजांच्या नाववर सरकारचा जोगवा
निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
Mar 4, 2014, 09:17 PM ISTराजे सरकारची `जिंदाल`वर मेहरबानी कशासाठी?
राजस्थानातील भिलवाडामध्ये नवीन जिंदाल यांच्या कंपनीला खाणपट्टे देण्याचं प्रकरण पुन्हा तापू लागलंय. निवडणुकीआधी भाजपनं यासंदर्भात काळी पत्रिका काढली होती.
Feb 25, 2014, 01:55 PM ISTकाँग्रेसचं सरकार चालवतं तरी कोण, उद्धव ठाकरेंचा सवाल
आदर्श प्रकरणी राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
Dec 28, 2013, 08:58 PM ISTदिल्लीत ‘आप’चं सरकार, आज होणार घोषणा
दिल्लीमध्ये सरकार स्थापनेकडे आम आदमी पार्टी आता कूच करतेय... अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे… आम आदमी पक्षाच्या जनमत चाचणीत दिल्लीकरांनी हा कौल दिलाय.
Dec 23, 2013, 08:28 AM ISTदिल्लीत सरकार बनविण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करणार ‘आप’
देशाची राजधानी दिल्लीत सरकार बनविण्यासंदर्भातल्या आपल्या भूमिकेबाबत आता आम आदमी पक्ष थोडा नरमलेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार आता ‘आप’ दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे. पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांच्या घरी ‘आप’ची बैठक सुरु आहे. ज्यात पहिल्यांदाच दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या पर्यायांबाबत आपण विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय.
Dec 13, 2013, 03:56 PM ISTआता लाल दिवा फक्त घटनात्मक पदाधिकाऱ्यांना- सुप्रिम कोर्ट
वाहनांवर लाल दिवा वापरण्याबाबत सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिलाय. केवळ घटनात्मक पदावरी मान्यवरांच्या वाहनांवरंच लाल दिवा वापरता येणार आहे. मात्र त्याबरोबर सायरनचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आलाय.
Dec 10, 2013, 12:57 PM IST‘भाजप’च्या ‘जादू’चा राज्य हिवाळी अधिवेशनावर परिणाम?
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरु होतंय. नेल्सन मंडेला यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला जाणार आहे.
Dec 9, 2013, 12:09 PM ISTनागपूर हिवाळी अधिवेशन; विरोधक सरकारला घेरण्यास सज्ज
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर इथं सुरू होतंय. या अधिवेशनात जादुटोणाविरोधी विधेयक संमत करण्याचा चंग सरकारनं बांधलाय. त्याचबरोबर आदर्श अहवाल, वीज आणि सिंचन घोटाळा, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. आठ तारखेला पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल असल्यामुळं नऊ तारखेपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यावर निवडणुकीचे सावट असणार आहे.
Dec 8, 2013, 02:06 PM ISTमोदींची ‘ललकार’, सरकारला धरलं धारेवर!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारवर हल्लाबोल केलाय. सीमेवर भारतीय जवान शहीद होतायेत आणि सरकार झोपेत असल्याचं टीकास्त्र मोदींनी सोडलंय. जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेल्या ‘ललकार’ रॅलीत त्यांनी ही टीका केलीय.
Dec 1, 2013, 07:25 PM IST३००० कोटींपेक्षा जास्त काळं धन जप्त!
केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागानं आर्थिक वर्ष २०१३ च्या पहिल्या सहा महिन्यांतच तब्बल ३००० कोटी रुपयांच्या काळ्याधनाचा पर्दाफाश केलाय. गुप्तचर विभागानं वर्षात कर चोरी आणि काळा पैसा बाळगणारे १७४ प्रकरणे उघडकीस केले आहेत. ‘सीबीआय’ या गुन्हेगारांची अधिक चौकशी करत आहे.
Nov 27, 2013, 05:34 PM ISTबटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार
कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2013, 09:56 PM IST