मोदींची ‘ललकार’, सरकारला धरलं धारेवर!

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारवर हल्लाबोल केलाय. सीमेवर भारतीय जवान शहीद होतायेत आणि सरकार झोपेत असल्याचं टीकास्त्र मोदींनी सोडलंय. जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेल्या ‘ललकार’ रॅलीत त्यांनी ही टीका केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 1, 2013, 07:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, जम्मू-काश्मीर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारवर हल्लाबोल केलाय. सीमेवर भारतीय जवान शहीद होतायेत आणि सरकार झोपेत असल्याचं टीकास्त्र मोदींनी सोडलंय. जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेल्या ‘ललकार’ रॅलीत त्यांनी ही टीका केलीय.
जम्मूच्या ललकार रॅलीत मोदींनी सेपरेट स्टेटऐवजी ‘सुपर स्टेट’चा आग्रह धरला. स्वतंत्र राज्याच्या खुळापायी काश्मीरच्या सरकारनं राज्याचं वाटोळं केल्याची टीका मोदींनी केली.
जम्मू-काश्मीरमधील जनता दररोज दहशतीच्या छायेत वावरत असून या परिस्थितीला पंडित जवाहरलाल नेहरूच जबाबदार आहेत, असा आरोपही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला. काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी शक्तींना केंद्राकडून बळ दिलं जात असल्याचा हल्लाबोलही मोदींनी केला.
दहशतवादाच्या मुद्द्यावर केंद्रातील सरकार झोपी गेलेलं आहे, असा आरोपही मोदींनी सरकारवर केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.