www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.
बटाट्याच्या किंमतीही किलोमागे 10 ते 15 रूपयांनी वाढल्या असून, त्यामुळे सामान्यांच्या किचनचे बजेटच कोलमडून जाणार आहे. गेल्या आठवड्यापर्यंत बटाट्याचे दर किलोमागे 15 ते 20 रूपये होते. मात्र ते आता 25 रूपये किलोवर पोहोचलेत... नाशिकमध्ये सध्या कांद्याबरोबर टोमॅटोही भाव खाऊ लागले आहेत.
टोमॅटोचे किरकोळ बाजारतील दर पन्नास रुपये किलोवर पोहोचले असून कृषी उत्पन्न बाजारसमितीतही जाळीचे दर वधारले आहेत. या हंगामात दरवर्षी 80ते 90 टक्के टोमॅटो माल विक्रीसाठी येत असतो. मात्र पावसामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाल्याने तसेच रोपे पाण्यामुळे जळाल्याने आवक घटली आहे.
अतिवृष्टीमुळे बटाट्याच्या पिकाचे नुकसान झाले असून, बाजारात कमी बटाटा आल्याने भाव वाढल्याची माहिती व्यापा-यांनी दिलीय. सध्या कांदा 70 रूपये किलो, टोमॅटो 40 रूपये किलो आणि बटाटा 25 रूपये किलो झाल्याने ग्राहक रडकुंडीला आलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.