www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशाची राजधानी दिल्लीत सरकार बनविण्यासंदर्भातल्या आपल्या भूमिकेबाबत आता आम आदमी पक्ष थोडा नरमलेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार आता ‘आप’ दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे. पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांच्या घरी ‘आप’ची बैठक सुरु आहे. ज्यात पहिल्यांदाच दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या पर्यायांबाबत आपण विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय.
‘आप’चे नेता कुमार विश्वास म्हणाले की काँग्रेस आणि भाजपची मदत न घेता जर सरकार बनू शकत असेल तर त्याचा आम्ही विचार करु. त्यांच्या मते राजकीय सल्लागार समिती याबाबत अखेरचा निर्णय घेईल. तर अरविंद केजरीवाल शनिवारी सकाळी राज्यपालांना भेटायला जाणार आहे.
दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांनी दिल्लीत सरकार बनविण्यासंदर्भात विचार करावा, असं म्हणत आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना शनिवारी चर्चेसाठी बोलावलंय. आपनं निवडणुकीत २८ जागा जिंकल्या असून तो दुसरा मोठा पक्ष ठरलाय.
यापूर्वी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. हर्ष वर्धन यांनी उपराज्यपालांची भेट घेतली. मात्र दिल्लीत आपल्याला स्पष्ट बहुमत नसल्यानं आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करु, असं भाजपनं स्पष्ट केलंय. उपराज्यपालांनी हर्ष वर्धन यांना दिल्लीत सरकार बनविण्याचा प्रस्ताव दिला होता.
मिळालेल्या माहितीनुसार भाजप आणि एनडीएतील सहकारी पक्ष अकाली दलची एक सीट मिळून ७० सदस्यीय दिल्ली विधासभेत त्यांच्याकडे ३२ सीट्स आहेत. तर ‘आप’कडे २८. काँग्रेसजवळ आठ आणि जदयूला एकाच सीटवर आनंद मानावा लागलाय. तर एका सीटवर अपक्ष उमेदवार विजयी झालाय. त्यामुळं आता दिल्लीत सत्ता कोणाची हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल...
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.