राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीने केली तिकोंडी गावाची कोंडी

सांगली जिल्ह्यातील तीकोंडी या गावामधील ग्रामस्थांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले. राष्ट्रवादीने काँग्रेसने या गोष्टीचा चांगलाच सूड उगवायला सुरूवात केली आहे.

Feb 24, 2012, 06:53 PM IST

नाशिकमध्ये आघाडीचा 'ब्लेमगेम'

नाशिकचा गड राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली. इतकं करुनही आघाडीची गाडी फक्त ३५ जागांपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळेच आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडत ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे.

Feb 22, 2012, 08:29 PM IST

पैसेवाटपावरून मनसेचा राडा

नाशिकमधील पंचवटीच्या प्रभाग क्र. १४ मध्ये मतदानाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून मनसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

Feb 16, 2012, 05:32 PM IST

आनंद परांजपेंची पुन्हा शिवसेनेवर टीका

शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले खासदार आनंद परांजपे यांनी ठाण्यात मतदान केलं. यावेळीही त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मला शिवसेनेनं प्रचारासाठी बोलावलं नाही असा आरोप त्यांनी सेनेवर केला.

Feb 16, 2012, 03:12 PM IST

नागरिकांच्या 'स्वाभिमाना'ची लढाई ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६० या प्रभागातून प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र स्थानिक आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक लक्ष्मण जगताप यांनी बंडखोर उमेदवार हर्षल ढोरे यांना पाठिंबा दिला आहे.

Feb 10, 2012, 05:40 PM IST

शिवसेनेचं लक्ष सोन्याच्या अंड्यांवर- पवार

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असताना शिवसेनेचे नेते मात्र मुंबईतच बसून होते. मुंबई ही शिवसेनेसाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी असून या सोन्याच्या अंड्यावर शिवसेनेचं लक्ष असल्याची टीका शरद पवारांनी केली आहे.

Feb 10, 2012, 01:43 PM IST

मुंब्र्याच्या प्रश्नावर आघाडी नेत्यांची उडाली भंबेरी

ठाण्यात आघाडीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा भागाकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर नेत्यांची भंबेरी उडाली. मुंब्रा भागात औद्योगिक वसाहत उभारण्याचं शरद पवारांनी दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार ? या गुगलीनं नेते गांगरून गेले.

Feb 9, 2012, 08:35 AM IST

आघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

Feb 8, 2012, 11:43 AM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये घडळ्याचा गजर झाला

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या वैदुवस्ती प्रभागातून रामदास बोकड बिनविरोध निवडून आलेत.

Feb 7, 2012, 08:51 PM IST

अकोल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल

अकोल्यात संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला केलाय. तिकीट न मिळाल्याच्या निषेधार्थ शहराध्यक्ष संदिप पुंडकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली

Feb 7, 2012, 06:29 PM IST

ठाण्यात राष्ट्रवादीच्या होर्डिंगवर आठवलेंची हरकत

ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या होर्डींगवर आरपीआयचा उल्लेख आहे. त्यावरुन रामदास आठवले यांनी हरकत घेतली आहे.

Feb 6, 2012, 02:38 PM IST

नाशिकमध्ये निवडणुकीला हिंसक वळण

नाशिक पालिका निवडणुकीला हिंसक वळण लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारच्या अर्जावर हरकत घेणाऱ्या शिवसेना उमेदवाराला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Feb 4, 2012, 10:56 PM IST

नितेश राणेंचा अजितदादांना इशारा

द्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि 'स्वाभिमान' संघटनेचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं आहे. अजित पवारांनी राजकीय संन्यास घेण्यास तयार राहावे असा इशारा नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

Feb 4, 2012, 05:25 PM IST

संजय राऊत यांचा राज, राष्ट्रवादीला टोला

राज ठाकरेंनी स्वत:ची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबरोबर करू नये असा टोला, पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावलाय. तसंच शिवाजी पार्कच्या सायलेन्स झोनला शिवसेनेनेही विरोध केल्याची बाबही राऊत यांनी निदर्शनास आणून दिली.

Feb 4, 2012, 10:10 AM IST

'जाऊ बाई' जोरात !

सांगली जिल्ह्यातल्या येळावी गटातून दोन सख्या जावा एकमेकींच्या विरोधात उभ्या आहेत. ज्येष्ट नेते विश्वास पाटील यांची मोठी सून तेजस्विनी पाटील या काँग्रेसकडून रिंगणात आहेत.

Feb 3, 2012, 10:37 PM IST