शाहरुखच्या केकेआरला तो निर्णय महागात पडणार, श्रेयस अय्यरवर मेगा ऑक्शनमध्ये लागली रेकॉर्ड ब्रेक बोली

IPL 2025 Mega Auction : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चं विजेतेपद जिंकवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरला ऑक्शनपूर्वी रिटेन केलं नाही. मात्र आता त्यांना ही चूक महागात पडली. 

पुजा पवार | Updated: Nov 24, 2024, 05:04 PM IST
शाहरुखच्या केकेआरला तो निर्णय महागात पडणार, श्रेयस अय्यरवर मेगा ऑक्शनमध्ये लागली रेकॉर्ड ब्रेक बोली  title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Mega Auction : जगातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएल 2025 साठी होणार हे मेगा ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात होतं आहे. यंदाच्या ऑक्शनमध्ये 577 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चं विजेतेपद जिंकवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरला ऑक्शनपूर्वी रिटेन केलं नाही. मात्र आता त्यांना ही चूक महागात पडली. आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये श्रेयस अय्यर हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पंजाब किंग्सने 26.75  कोटींची बोली लावून श्रेयस अय्यरला विकत घेतले. 

श्रेयस अय्यरवर रेकॉर्ड ब्रेक बोली : 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 ची चॅम्पिअनशिप जिंकली. मागील अनेक वर्षांपासून श्रेयस अय्यर हा केकेआरचा भाग होता. मात्र केकेआरने ऑक्शनपूर्वी श्रेयस अय्यरला रिटेन केलं नाही. कोलकाता नाईट रायडर्सने फक्त सुनील नरेन, रहमनुल्लाह गुरबाज, रिंकू सिंह, हर्षित राणा या 5 खेळाडूंना रिटेन केलं. त्यामुळे श्रेयस अय्यर मेगा ऑक्शनमध्ये आला. श्रेयसने आपलं नाव 2 कोटींच्या बेस प्राईजवर नोंदवलं होतं. श्रेयस ऑक्शनमध्ये आला तेव्हा जवळपास सर्वच फ्रेंचायझी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याने त्यांनी अय्यरवर मोठी बोली लावली. RTM कार्ड वापरून केकेआर श्रेयस अय्यरला परत घेऊ इच्छित होता मात्र श्रेयसची रक्कम वाढतच गेल्याने केकेआरला त्याच्यावर पाणी सोडावे लागले. 

हेही वाचा : अर्शदिप सिंहवर लागली आयपीएल 2025 मधील पहिली बोली, 18 कोटींना 'या' टीमने खरेदी केलं

 

श्रेयसने मोडला ऑस्ट्रेलियन खेळाडूचा रेकॉर्ड : 

आयपीएल 2024 च्या मिनी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्क हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला केकेआरने 24.75  कोटींना विकत घेतले होते. मात्र श्रेयसने मेगा ऑक्शनमध्ये येऊन ऑस्ट्रेलियन खेळाडूचा हा रेकॉर्ड मोडला. श्रेयस अय्यरवर पंजाब किंग्सने 26.75  कोटींची बोली लावून त्याला विकत घेतले.