www.24taas.com, अकोला
अकोल्यात संतप्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्ला केलाय. तिकीट न मिळाल्याच्या निषेधार्थ शहराध्यक्ष संदिप पुंडकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. एबी फॉर्म देणार असल्याचं सांगत पक्षानं झुलवत ठेवल्याचा आरोप संतप्त कार्यकर्त्यांनी केला.
संदीप पुंडकर हे भारिप बहुजन महासंघाच्या इशा-यावर काम करत असल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. निष्ठावंतांना डावलून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीटे देण्यात ल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला. या घटनेनंतर संदीप पुंडकरांच्या निवासस्थानाभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.