नागरिकांच्या 'स्वाभिमाना'ची लढाई ?

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६० या प्रभागातून प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र स्थानिक आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक लक्ष्मण जगताप यांनी बंडखोर उमेदवार हर्षल ढोरे यांना पाठिंबा दिला आहे.

Updated: Feb 10, 2012, 05:40 PM IST

कैलास पुरी, www.24taas.com, पुणे

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ६० मधल्या लढतीकडं सध्या शहराचं लक्ष लागलं आहे. या प्रभागातून प्रशांत शितोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र स्थानिक आमदार आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक लक्ष्मण जगताप यांनी बंडखोर उमेदवार हर्षल ढोरे यांना पाठिंबा दिला आहे.

 

एवढंच नाही बंडखोरीच्या प्रचाराचा नारळही आमदारांनी फोडला आहे. त्यामुळं या लढतीत चांगलीच रंगत आली आहे. ही लढत सांगवी परिसरातल्या नागरिकांच्या स्वाभिमानाची लढाई असल्याचं सांगत प्रशांत शितोळे यांनी विजयाचा दावा केला आहे.

 

दुसरीकडं जगताप यांच्या पाठिंब्यामुळं विजय निश्चित असल्याचा दावा बंडखोर उमेदवार ढोरे करत आहेत. उघडपणे बंडखोराचं समर्थन केल्यामुळं या लढतीकडे पिंपरी-चिंचवड शहराचं लक्ष लागलं आहे. आता यामध्ये कोण बाजी मारतंय ते पाहण्यासाठी १७ तारखेपर्यंत वाट पहावी लागेल.