IPL 2025 Mega Auction : जगातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएल 2025 साठी होणार हे मेगा ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात होतं आहे. यंदाच्या ऑक्शनमध्ये 577 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएलच्या सर्व संघांमध्ये ऑक्शन टेबलवर मोठी लढत झाली. यामुळे ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यासह त्याने श्रेयस अय्यर (26.75 कोटी) आणि मिचेल स्टार्क ( 24. 75 कोटी) चा रेकॉर्ड सुद्धा मोडला आहे.
ऋषभ पंत हा 2016 पासून दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. मात्र आयपीएल 2025 च्या ऑक्शनपूर्वी त्याला रिलीज करण्यात आलं. त्यामुळे पंतने स्वतःचं नाव 2 कोटींच्या बेस प्राईजवर ऑक्शनमध्ये नोंदवलं. ऋषभ पंतला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक फ्रेंचायझी उत्सुक होत्या. ऋषभसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनऊ सुपर जाएंट्स या संघांमध्ये मोठी लढत होती. लखनऊने पंतवर 20.75 कोटींची बोली लावली. या किंमतीवर दिल्ली कॅपिटल्स RTM कार्ड घेऊन पंतला आपल्या संघात घेण्यासाठी तयार होते. तेवढ्यात लखनऊने ही थेट 7 कोटी वाढवून ऋषभ पंतवर 27 कोटींची बोली लावली. ही बोली आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूवर लागलेली सर्वात मोठी बोली होती. दिल्लीने RTM कार्ड सह 27 कोटींना पंतला घेण्यास नकार दिला. त्यामुळे लखनऊने ऑक्शनमध्ये ऋषभ पंतला 27 कोटींना खरेदी केलं.
हेही वाचा : शाहरुखच्या केकेआरला तो निर्णय महागात पडणार, श्रेयस अय्यरवर मेगा ऑक्शनमध्ये लागली रेकॉर्ड ब्रेक बोली
MEET THE MOST EXPENSIVE PICK IN THE TATAIPL HISTORY
Watch IPLAuction LIVE NOW on JioCinema & StarSportshttps://t.co/nuBiKyfyEh#RishabhPant #TATAIPL #IPLAuctiononJioStar JioCinemaSports LSG pic.twitter.com/kgMFhdE5g1
— JioCinema (JioCinema) November 24, 2024
आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये पंतपूर्वी श्रेयस अय्यरवर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली होती. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने 26.75 कोटींना विकत घेतले होते. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्कचा 24. 75 कोटी मिळवण्याचा रेकॉर्ड मोडला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या राउंडला ऋषभ पंतने 27 कोटी घेत अय्यरला याबाबतीत मागे सोडले. लखनऊने त्यांचा कर्णधार असलेल्या केएल राहुलला रिलीज केल्यामुळे त्यांना संघासाठी कर्णधाराची आवश्यकता होती. ऋषभ पंत याने मागील काही वर्ष दिल्ली कॅपिटल्सचे सुद्धा नेतृत्व केले आहे त्यामुळे लखनऊला उत्कृष्ट फलंदाज, विकेटकीपर सह संघासाठी कर्णधार सुद्धा मिळाला आहे.