www.24taas.com, ठाणे
ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या होर्डींगवर आरपीआयचा उल्लेख आहे. त्यावरुन रामदास आठवले यांनी हरकत घेतली आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र या गोष्टीचं समर्थन केलं. राष्ट्रवादीला आरपीआय गवई गटानं पाठींबा दिल्याचा दावा त्यांनी केला, तसं पत्रकच त्यांनी दाखवलं.
कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह हेसुद्धा आरपीआयबरोबर आघाडी झाल्याचे ठोकून देत असल्याने रिपब्लिकन कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत.
कॉंग्रेसची मुंबईत केवळ प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीबरोबर आघाडी आहे. असे असताना समाधान सरवणकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलेले मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर यांनी रिपाइंबरोबर आघाडी झाल्याचे बिनदिक्कतपणे सांगितले तर राष्ट्रवादीचे वॉर्ड क्रमांक ८९ मधील उमेदवार गणेश मांजरेकर यांनी पदयात्रा काढण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून पालिकेला पत्र लिहिले आहे.
त्या पत्रात प्रकाश आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाबरोबर, कवाडे आणि गवई यांच्या आरपीआयबरोबर आघाडी झाल्याचे म्हटले आहे. वास्तविक आंबेडकर यांची कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर मुंबईत आघाडी झालेली नाही. तसेच आंबेडकर आणि कवाडे यांच्या पक्षाचे नाव ‘आरपीआय’ही नाही. असे असतानाही ‘आरपीआय’च्या नावाचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून सर्रास गैरवापर होत असल्याने रिपब्लिकन कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत.
[jwplayer mediaid="42415"]
संबंधित बातम्या
आमचा विजय तर होणारच – उद्धव ठाकरे
महापौर राज नव्हे, RPI ठरवेल – आठवले
‘निवडून आल्यानंतर मी पक्ष सोडणार नाही’