Mahayuti MVA Strike Rate: विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. निवडणुकीचा विजय आणि पराजय स्ट्राईक रेटमध्ये मोजण्याची पद्धत गेल्या काही निवडणुकांपासून सुरू झालीय. या निवडणुकीत कुणाचा स्ट्राईक रेट किती याचीही चर्चा सरू झालीय. या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा किती स्ट्राइक रेट आहे. महायुतीच्या त्सुनामीसमोर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झालाय. या निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सर्वात कमी आहे
महायुतीनं 80 टक्के स्ट्राईकच्या रेटनं 230 जागा जिंकल्या आहेत. तर मविआनं 15 टक्के स्ट्राईकच्या रेटनं 46 जागा जिंकल्या आहेत. महायुती स्ट्राईक रेट- 80 टक्के तर मविआ स्ट्राईक रेट - 15 टक्के आहे.
महायुतीच्या महाविजयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. महायुती आणि महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक आहे म्हणजेच 88 टक्के आहे. भाजपनं 149 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 132 जागांवर विजय मिळवलाय. महायुतीत भाजपनंतर स्ट्राईक रेटमध्ये दुस-या क्रमाकांवर आहे. शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 72 टक्क आहे. शिवसेनेनं 81 जागा लढवल्या होत्या 57 टक्के जागा जिंकल्या आहेत. तर महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी तिस-या स्थानी आहे. राष्ट्रवादीनं 59 जागा लढवल्या होत्या 41 जागांवर विजय मिळवलाय. राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा 68 टक्के एवढा आहे.
लोकसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा सर्वाधिक होता. मात्र,विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट हा एकदम तळाला गेलाय. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त दहा जागा जिंकल्यानं स्ट्राईक रेट हा फक्त 10 टक्क्यांवर आलाय. महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त आहे. 95 पैकी 20 जागा जिंकत शिवसेना युबीटीचा स्ट्राईक रेट हा 21 टक्के आहे. तर काँग्रेसनं 101 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 16 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचा स्ट्राईक रेट हा 15 टक्के आहे.
निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्षाचा राहिलाय तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी लोकसभेच्या तुलनेत तिप्पट वाढलीय. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला 3.60 टक्के मते मिळाली होती. परंतु आता विधानसभा निवडणुकीत 9..01 टक्के मते मिळाली आहेत.