ठाण्यात तिकीटांचा 'नातीखेळ'
महापालिका निवडणुकीत कुणी मुलाला तिकीट दिलंय, कुणी पत्नीला, कुणी भावाला किंवा अन्य कुठल्या नातेवाईकाला. ठाण्यात मात्र एकाच घरात कुठे दोन तर कुठे तीन जणांना तिकीट मिळालं आहे.
Feb 2, 2012, 10:45 PM ISTकाँग्रेस- राष्ट्रवादीत बंडाळी
सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षालाही बंडाचा फटका बसला आहे. तिकीट न मिळालेल्या एका इच्छुक महिला कार्यकर्तीने थेट प्रदेशाध्यक्षांना जाब विचरण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Feb 1, 2012, 10:33 PM ISTराष्ट्रवादीचा राणेंवर 'हल्लाबोल'
कोकणात नारायण राणेंनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जाहीर वस्त्रहरण केल्यानंतर बिथरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राणेंवर आज एकमुखी हल्ला चढवला. सर्वांवरच राणेंनी टीकेचे प्रहार केल्यानं राष्ट्रवादीनं आज राणेंवर हल्लाबोल केला.
Feb 1, 2012, 08:28 PM ISTअजित पवारांचा नारायण राणेंवर पलटवार
उद्योगमंत्री नारायण राणेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे ते अहमदनगर इथे बोलत होते. नारायण राणेंचे मानसिक संतूलन बिघाडल्याने ते असे बोलतात अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली.
Feb 1, 2012, 04:08 PM ISTराष्ट्रवादीची मुंबईतील पहिली यादी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई महापालिकेसाठी 51 उमेदवारांची घोषणा केलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 58 जागा आल्या आहेत. आता राष्ट्रवादीच्या फक्त सात उमेदवारांची घोषणा होणं शिल्लक राहिलंय.
Jan 30, 2012, 09:00 AM ISTऔरंगाबादेत युतीसमोर 'झेडपी' राखण्याचं आव्हान
मराठवाड्याची राजधानी असलेलं औरंगाबाद शिवसेना भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या बालेकिल्ल्याला गेल्या विधानसभा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत तडे गेले. आता झेडपी राखण्याचं मोठं आव्हान युतीसमोर आहे.
Jan 28, 2012, 11:18 PM ISTअडसूळांचा टाइम्सविरोधात १०० कोटींचा दावा !
महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसच्या झालेल्या तोडफोडीचं खासदार आनंद अडसूळ यांनी समर्थन केलं आहे. इतकंच नव्हे, तर टाइम्सविरुद्ध रुपये १०० कोटींचा दावा ठोकणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Jan 28, 2012, 07:04 PM IST'मटा'च्या कार्यालयात शिवसैनिकांची तोडफोड
महाराष्ट्र टाइम्सच्या ऑफिसमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या आजच्या अंकात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ राष्ट्रवादीच्या गळाला लागले असल्याची बातमी छापण्यात आली होती. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी तोडफोड केली.
Jan 28, 2012, 05:03 PM ISTशिवाजी माने राष्ट्रवादीत, पिचडांचा फुसकाबार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवाजी माने यांनी उपमुख्य़मंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अधिकृत प्रवेश केला. शिवाजी माने हे काँग्रेस हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष आहेत. दरम्यान, एका पक्षाचा अध्यक्ष आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असून उद्या राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी काल सांगलीत केला होता. मात्र, ते माजी खासदार असल्याने त्यांचा बार फुसका निघाल्याची चर्चा आहे.
Jan 28, 2012, 04:05 PM ISTनाशिकमध्ये महाआघाडी ?
नाशिकमध्ये आघाडीची महाआघाडी होण्याची चिन्ह आहेत. आघीडीनं माकप, भाकप आणि भारीप बहुजन महासंघाला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यांना जागा देताना दोन्ही काँग्रेसची दमछाक होत आहे.
Jan 27, 2012, 10:52 PM ISTजिल्हापरिषदेची धांदल, राष्ट्रवादीत बांदल
मंगलदास बांदल यांनी मंगळवारी अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर रात्री साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बांदल यांच्यावर २००६ मध्ये ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागासवर्गीय जमीन बळकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Jan 27, 2012, 10:11 PM ISTउल्हासनगरमध्ये 'आनंद'
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला गेलेल्या राष्ट्रवादीच्या ज्योती कलानींसोबत खासदार आनंद परांजपेंनीही हजेरी लावल्यामुळे वातावरणात एक वेगळाच रंग भरला होता.
Jan 27, 2012, 09:28 PM ISTमहापालिकेची उमेदवारी, घरच्या घरी !
पुण्यात विधानसभेच्या आठ पैकी सात तर विधानपरिषदेच्या एका आमदाराने महापालिकेसाठी घरातल्या व्यक्तींसाठी उमेदवारी मागितलेली आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेतले आमदार आहेत.
Jan 25, 2012, 10:52 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये प्रतिष्ठेची लढत
महापालिका निवडणूकांच्या उमेदवारांची अजून घोषणा झाली नसली तरी पिंपरी चिंचवडमध्ये सध्या महापौर योगेश बहल आणि यशवंत भोसले या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील संभाव्य लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे.
Jan 24, 2012, 11:04 PM ISTकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा पेच
काँग्रेस मुंबईत १६९ जागा लढवणार आहे, तर त्यांच्या कार्यालयातून तब्बल अडीच हजार अर्ज वितरित झालेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस ५८ जागा लढवणार असून ४९८ जण उमेदवारीसाठी इच्छूक आहेत.
Jan 24, 2012, 08:57 PM IST