संभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्या विरोधात निवडणुकीतील गैरप्रकारांबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Jan 19, 2012, 08:13 AM ISTघरात वादावादी, सभेत 'राष्ट्रवादी' !
गोपीनाथ मुंडेंशी बंड केल्यानंतर धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हजर राहणार असून या विषयावर सविस्तर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Jan 18, 2012, 05:19 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय जगदीश शेट्टी आणि त्यांचे नगरसेवक भाऊ उल्हास शेट्टी यांचं जातप्रमाणपत्रं खोटं असल्याचा आरोप शिवसेना खासदार गजानन बाबर यांनी केला आहे.
Jan 18, 2012, 09:57 AM ISTसांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने
राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसाठी दोन्हीकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असताना, अपेक्षेप्रमाणे सांगलीत मात्र दोन्ही कॉंग्रेस एकमेंकाविरुद्ध ठाकल्याचे चित्र दिसतयं. राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधात कांग्रेस बंड ठोकत आज रस्त्यावर उतरली.
Jan 17, 2012, 05:51 PM ISTमुंडे घराण्यात 'भाऊबंदकी'
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेवर राजकीय संकट ओढवली आहे. पुतणेशाहीचे बंड शमत नाही तोच आता भाऊबंदकीने डोक वर काढलं आहे. गोपीनाथ मुंडेंचे बंधु पंडीतअण्णा हे थेट राष्ट्रवादीमध्ये लवाजम्यासह दाखल झाले आहेत.
Jan 16, 2012, 02:20 PM ISTअबू आझमींचं टीकास्त्र
वरिष्ठ नेत्यांसमोर आपली पत वाढवण्यासाठी जितेंद्र आव्हाड पैशाच्या जोरावर नगरसेवक फोडत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्रा इथल्या सपाच्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
Jan 16, 2012, 08:20 AM ISTराष्ट्रवादी-प्रकाश आंबेडकरांमध्ये महत्वपूर्ण बोलणी
राष्ट्रवादी काँग्रेसने दलित मतांची बेगमी करण्यासाठी व्युहरचना आखत भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांशी बोलणी सुरु केली आहेत.
Jan 15, 2012, 12:29 PM ISTहर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीला 'धक्का' !
हर्षवर्धन पाटलांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना झटका दिला आहे. इंदापूरमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
Jan 14, 2012, 09:30 PM ISTपुतण्यांकडून 'खुलासा', काकांना 'ग्रीन सिग्नल'
शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाईची शक्यता असतानाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्याला निवडणूक आयोगानं ग्रीन सिग्नल दिला आहे.
Jan 13, 2012, 05:10 PM ISTवॉर्ड वाटपावरुन आता काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा तिढा
आघाडीतला जागावाटपाचा तिढा सुटला असला, तरी वॉर्ड वाटपावरुन आता काँग्रेस-राष्ट्रवादीत नवा तिढा निर्माण झाला आहे. तोट्याचे वॉर्ड मिळाल्याने राष्ट्रवादी नाराज आहे.
Jan 12, 2012, 12:13 AM ISTमहापौर बहल यांची पुन्हा 'कोंबडी पळाली'
पिंपरी-चिंचवडचे महापौर योगेश बहल अडचणीत आले आहेत. महिला बचत गटांच्या नावाखाली अनुदान लाटण्याच्या प्रकरणात महापौरांचाही समावेश असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेनं केला आहे.
Jan 12, 2012, 12:02 AM ISTपुणे महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या संदर्भातली अधिकृत घोषणा १४ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.
Jan 11, 2012, 10:02 PM ISTपवारांचा काँग्रेसला आघाडी बाबत निर्वाणीचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस आता आघाडी करण्याबाबत आक्रमक झाली आहे. आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीनं काँग्रेसला आता अल्टिमेटम दिला आहे. आघाडीचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत घ्या असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला दिला.
Jan 8, 2012, 03:24 PM ISTअजित पवारांचा पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उभे करणा-यांना फटकारले. त्यांचा रोख भास्कर जाधव यांच्याकडं होता. नगरपालिका निवडणूकीत चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या मुलानं पक्षा विरोधात आघाडी उभी केली होती. अजित पवार यांनी भाषणात जाधव यांचं नाव घेतलं नाही. अशा घटनांमुळं पक्षशिस्त मोडते असं त्यांनी स्पष्ट केलं.
Jan 8, 2012, 02:14 PM ISTकाँग्रेसला 'गुरु' मंत्र, आघाडी नको!
आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करू नये यासाठी उत्तर मध्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत आक्रमक झालेत. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना जागावाटपासाठी २००७ सारखी एक बैठक बोलावण्याचे आदेश दिलेत
Jan 7, 2012, 12:02 PM IST