कचरा उचलण्याचं कंत्राट अबू आझमींना, मनसेचा विरोध
मुंबई महापालिकेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींना कंत्राट देण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. कचरा उचलण्याचं कंत्राट अबू आझमींच्या ‘गल्फ हॉटेल कंपनी’ला देण्यात आलं आहे.
Feb 18, 2013, 07:28 PM ISTबाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युची नोंद जन्मवहीत!
बाळासाहेब ठाकरेंसह अनेक जणांच्या मृत्यूची नोंद जन्मवहीत करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण संपूर्ण मुंबईमधील स्मशानभूमींमध्ये मृत्यूवहीच उपलब्ध नाहीत.
Feb 7, 2013, 11:00 PM ISTमुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई महापालिकेचे सन २०१२- २०१३ साठीचा अर्थसंकल्प महापालिकेसमोर मांडण्यात आला.. २०१२-२०१३ साठीचा अर्थसंकल्प हा २६ हजार 5८१ कोंटीचा होता.. तर यंदाचा अर्थसंकल्प हा २७ हजार 5७८ कोटींचा आहे. सुमारे १ हजार कोटीनं वाढलेल्या या बजेटमध्ये अनेक तरतुदींचा समावेश आहे.
Feb 4, 2013, 06:28 PM ISTमुंबई महापालिकेचा ५८६ कोटींचा झोल; कॅगचा रिपोर्ट
मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे कॅगनं काढलेत. रस्त्याच्या कामात ५८६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलाय.
Dec 21, 2012, 05:05 PM ISTपालिकेच्या शाळेपेक्षा खासगीच बरी!
मुंबई महापालिका एका विघार्थ्यांवर तब्बल 50 हजार रूपये खर्च करूनही विघार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण 30 हजारांच्या घरात गेलयं.याचवेळी खाजगी शाळा एका विघार्थ्यांवर वर्षाला 36 हजार रूपये खर्च करते.या खाजगी शाळेतील विघार्थ्यांची गुणवत्ता वाढते.
Dec 19, 2012, 10:27 PM ISTबेस्ट घेणार मुंबई महापालिकेकडून कर्ज
बेस्टची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी बेस्टनं मुंबई महापालिकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय. बेस्टला 12 टक्के दरानं पाच वर्षांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा प्रस्ताव बेस्ट बैठकीत मंजूर करण्यात आलाय.
Oct 23, 2012, 08:54 AM ISTकचऱ्यापासून वीजनिर्मिती की पैसानिर्मिती?
डम्पिंग ग्राऊंड हटवण्यासाठी नुकतंच विक्रोळीतल्या रहिवाशांनी आंदोलन केलं होतं. या डम्पिंगवर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतलाय.
Oct 18, 2012, 09:23 AM ISTराज ठाकरे कडाडले... खड्डे सारखे सारखे का पडतात?
मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वारंवार खड्डे का पडतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Oct 8, 2012, 03:28 PM ISTइमारतींमध्ये आगीचा धोका टाळण्यासाठी...
काचबंद इमारतीत आगीसारखी एखादी घटना घडल्यानंतर जिवीतहानी तसच वित्तहानी टाळण्याबाबत मुंबई महापालिकेला उशिरानं का होईना मात्र उपरती झालीय.
Sep 12, 2012, 01:25 PM IST`ओसी` नसलेल्या इमारतींची नोंदच नाही
मुंबईतील साडेपाच हजार इमारतीना ओसी मिळाली नसल्याची माहीती मुख्यमंत्र्यानी विधीमंडळात दिली होती.मात्र मुंबई महापालिकेकडे किती इमारतीना ओसी मिळाली आहे? किती इमारतीना ओसी दिलेली नाही यांची माहिती पालिकेकडे नोंदच नसल्याच उघड झालंय.पालिकेन दिलेल्या माहीती अधिकारातना हे सत्य बाहेर आलंय.
Aug 9, 2012, 08:17 PM ISTअखेर पालिकेला आली जाग!
मुंबईतल्या रस्त्यांचं निकृष्टपणे काम करणाऱ्या 24 कंत्राटदारांवर महापालिकेनं 57 लाखांच्या दंडाची कारवाई केलीय. खड्डे बुजवण्याची जबाबदारी दिलेल्या इंजिनीअर्सवरही कारवाई बडगा उगारला जाणार आहे. मुंबईत आजच्या घडीला मुंबईतल्या रस्त्यांवर 10 हजार 770 खड्डे असल्याचा दावा करण्यात आलाय.
Aug 8, 2012, 04:01 AM ISTगोविंदा पथकाला मुंबई मनपाचा आधार
दहीहंडी तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनात सहभागी होणार्यांना महापालिकेने मदतीचा हात दिला आहे. सण साजरे होत असताना गोविंदा पथकात काम करणारे तसंच गणेश विसर्जन करणाऱ्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मुंबई महानगरपालिका त्याच्या कुटुंबाला १ लाख रुपयांची मदत देईल.
Aug 2, 2012, 09:16 AM ISTनगरसेवक होणार 'मालामाल'
मुंबई महापालिकेचे नगरसेवक मालामाल होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला आता महिन्याला २५ हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. सोबतच लॅपटॉप आणि एण्ड्रॉइड फोनचीही सुविधा आता नगरसेवकांना महापालिकेकडूनच मिळणार आहे.
Aug 1, 2012, 07:06 PM ISTपावसासाठी महापालिका घुसणार ढगात
मुंबई महापालिकेन कृत्रिम पावसासाठी इस्त्रायल पॅटर्न वापरण्याचा निर्णय घेतलायं. यासाठी पालिकेनं इस्त्रायलमधील मेटऑर कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर व्हीडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय.
Jul 31, 2012, 11:26 PM ISTमुंबई मनपाच्या जिमखाना विभागात भ्रष्टाचार
मुंबई महापालिकेच्या जिमखाना विभागात भ्रष्टाचार झालाय. जिमखान्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या वस्तू, जिमखाना जागेत उभी असणारी जाहीरात होर्डींग्ज यामध्ये तर गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंच आहे.
Jul 18, 2012, 10:22 PM IST