अखेर पालिकेला आली जाग!

मुंबईतल्या रस्त्यांचं निकृष्टपणे काम करणाऱ्या 24 कंत्राटदारांवर महापालिकेनं 57 लाखांच्या दंडाची कारवाई केलीय. खड्डे बुजवण्याची जबाबदारी दिलेल्या इंजिनीअर्सवरही कारवाई बडगा उगारला जाणार आहे. मुंबईत आजच्या घडीला मुंबईतल्या रस्त्यांवर 10 हजार 770 खड्डे असल्याचा दावा करण्यात आलाय.

Updated: Aug 8, 2012, 04:01 AM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या रस्त्यांचं निकृष्टपणे काम करणाऱ्या 24 कंत्राटदारांवर  महापालिकेनं 57 लाखांच्या दंडाची कारवाई केलीय. खड्डे बुजवण्याची जबाबदारी दिलेल्या इंजिनीअर्सवरही कारवाई बडगा उगारला जाणार आहे.  मुंबईत आजच्या घडीला मुंबईतल्या रस्त्यांवर 10 हजार 770 खड्डे असल्याचा दावा करण्यात आलाय.

मुंबईकरांना आणि मुंबईच्या रस्त्यांना खड्डे तसे नवीन नाहीत. मात्र, पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही शहरातल्या रस्त्यांवर तब्बल 10 हजार 770 खड्डे असल्याचं ‘पॉटहोल्स ट्रेसिंग सिस्टिम’द्वारे उघड झालंय. विशेष म्हणजे हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी दिलेल्या कंत्राटदारांनीही ‘कोल्डमिक्स’ तंत्राचा वापर करताना निकृष्ट काम केल्याचं आयआयटीच्या रिपोर्टमधून समोर आलंय. कंत्राटाच्या नावावर लूट करणाऱ्या या 24 कंत्राटदारांना 57 लाखांचा दंड ठोठावलाय. या कंत्राटदारांसोबत खड्डे बुजवण्याची जबाबदारी सोपवलेल्या  इंजिनिअर्सवरही कारवाई करणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय.

आयआयटी तज्ज्ञांनी महापालिकेच्या या 24 कंत्राटदारांबरोबर पॉटहोल ट्रेसिंग करणाऱ्या प्रोबिटी इंजिनियर सिस्टिमवर ताशेर ओढले आहेत. यामुळं पालिका इंजिनीअर्सच्या सव्हिर्स रिपोटमध्ये खराब कामाची नोंद करण्यात आलीयं. या अहवालाच्या आधारावर पालिका आयुक्तांनी उगारलेल्या या कारवाईच्या बडग्यामुळं यापुढे तरी मुंबईतले रस्ते खड्डे मुक्त असतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

.