मुंबई महानगरपालिका

मुंबई पालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती

मुंबई महापालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.

Jan 28, 2016, 03:18 PM IST

लालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं यंदाही चांगलाच दणका दिलाय. लालबागचा राजा मंडळाला मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेनं यंदाच्या वर्षी तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय... एरव्ही उत्साह दाखवणाऱ्या मंडळाची दंड भरण्यासाठी मात्र तयारी नाही.

Sep 30, 2015, 09:37 AM IST

मुंबईत ५५२ धोकादायक इमारतींची भर

प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यानंतर मुंबईतल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. मागील वर्षी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या ७७२ इमारतींवरील बीएमसीची कारवाई यंदाचा पावसाळा आला तरी संपलेली नाही. त्यातच यंदाही ५५२ धोकादायक इमारतींची भर पडली आहे. 

Jun 11, 2015, 09:23 AM IST

मुंबई पालिकेत गोंधळ : सहा नगरसेवक निलंबित तर सेनेची ४ जणांना नोटीस

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घातल्यामुळे कॉंग्रेसच्या सहा नगरसेविकांवर मंगळवारी १५ दिवसांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या औरंगाबादमधील ४ नगरसेवकांना शिवसेनेनं कायदेशीर नोटीस बजावलीय. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही नोटीस बजावण्यात आली. 

Mar 10, 2015, 10:30 PM IST

मुंबई अर्थसंकल्पात वाढ, स्मार्ट सीटीबरोबर सिमेंटचे रस्ते

मुंबईकरांना पालिकेने स्मार्ट सीटीचे स्वप्न दाखविले आहे. त्याचबरोबर शहरात सिमेंटचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तर कराचा बोजा टाकण्याचा इरादा पालिकेने या अर्थसंकल्पात स्पष्ट केलाय. तर पालिकेच्या शाळा हायटेक करण्यासाठी संगणकीय लॅब आणि विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा संकल्प सोडण्यात आलाय. यासाठी गतवर्षीपेक्षा जास्त तरतूद केल्याने अर्थसंकल्पात वाढ झालेली आहे.

Feb 4, 2015, 07:03 PM IST

अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मुंबई पालिकेची उधळपट्टी

मुंबई महापालिकेच्या उधळपट्टीचं आणखी एक उदाहरण समोर आलंय. अभ्यास दौ-याच्या नावाखाली सर्व गटनेत्यांनी तुर्कस्तानची भ्रमंती केल्यानंतर इतर समितींच्या सदस्यांना देशांतर्गत दौ-यांची परवनागी देण्यात आली आहे.

Jan 15, 2015, 01:21 PM IST

मुंबई पालिकेत मनसे-भाजपात जोरदार शाब्दीक चकमक

मुंबई महानगर पालिकेच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि  भाजप यांच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. काही वेळ सभागृहाचे कामकाज थांबविण्यात आले.

Nov 26, 2014, 04:50 PM IST