www.24taas.com, मुंबई
काचबंद इमारतीत आगीसारखी एखादी घटना घडल्यानंतर जिवीतहानी तसच वित्तहानी टाळण्याबाबत मुंबई महापालिकेला उशिरानं का होईना मात्र उपरती झालीय.
इमारतीचे आराखडे मंजूर करतांना प्रत्येक मजल्यावर पुरेशा प्रमाणात उघडता येतील अशा काचा लावण्याचा अध्यादेश मुंबई महापालिकेनं तयार केलाय. येत्या 15 दिवसांत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. काचबंद इमारतींमध्ये किमान 35 टक्के काचा उघडता आल्या पाहिजेत, अशा प्रकारचा हा अध्यादेश आहे. नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळताच त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल.
काही दिवसांपूर्वीच वांद्रे-कुर्ला संकुलातील एका काचबंद इमारतीला आग लागली होती. सुदैवानं या इमारतीत माणसे नसल्यानं जिवीतहानी टळली. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर हानी होऊ नये यासाठी अशा प्रकारची काळजी घेण्यात येतीय.