सनी देओलच्या 'गदर 3' मध्ये होणार 73 वर्षीय खलनायकाची एन्ट्री? अभिनेत्याने दिला मोठा इशारा

बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता 'गदर 3' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. यामध्ये नवीन खलनायकाची एन्ट्री होणार असल्याची माहिती समोर आलीय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 22, 2024, 01:13 PM IST
सनी देओलच्या 'गदर 3' मध्ये होणार 73 वर्षीय खलनायकाची एन्ट्री? अभिनेत्याने दिला मोठा इशारा title=

Gadar 3 : सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर 2' या चित्रपटाने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यानंतर आता सनी देओलच्या 'गदर 3' चित्रपटाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. या चित्रपटात सनी देओल, अमिषा पटेल तसेच अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांची नावे निश्चित झाली आहेत. मात्र 'गदर 3' चित्रपटाच्या खलनायकाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड सस्पेन्स आहे. यावेळी तारा सिंग पडद्यावर कोणाला मारताना दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

'वनवास' चित्रपटात काम केलेले नाना पाटेकर नुकतेच 'गदर 3' चित्रपटाच्या खलनायकाबद्दल बोलले. त्यांनी लल्लनटॉपशी बोलताना 'गदर 3' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे संकेत दिले. यावेळी नाना पाटेकर म्हणाले की, त्यांना खलनायकाच्या भूमिकेत कास्ट करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना कथेत बरेच बदल करावे लागतील.

'गदर 3'मध्ये नाना पाटेकर खलनायकाच्या भूमिकेत? 

73 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले की, 'गदर 3' मध्ये मी खलनायकाच्या भूमिकेत दिसलो तर सनी देओलने मला ॲक्शन सीनमध्ये मारण्यात काही अर्थ नाही. चित्रपटातील पात्रांना वेगवेगळ्या पद्धतीने कथा पुढे न्यावी लागेल. याबाबत दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्याशी चर्चा झाल्याची पुष्टी नाना पाटेकर यांनी केली. परंतु नाना पाटेकरांनी त्याला अधिकृत दुजोरा दिला नाहीये. 

'वनवास' चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही 

नाना पाटेकर यांनी नुकतेच 'गदर' चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. त्यांचा 'वनवास' हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात 'गदर 2'ची जोडी मुख्य भूमिकेत दिसली होती. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडू शकला नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 60 लाखांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 95 लाख रुपयांची कमाई केली. दोन दिवसांचे एकूण कलेक्शन हे 1.55 कोटी रुपये इतके आहे. 'वनवास' चित्रपटाचे बजेट 30 कोटी रुपये इतके आहे.