मागच्या 110 वर्षांत घडलं नाही ते 'पुष्पा 2'ने करुन दाखवलंय! 'बाहुबली 2' ही टाकलं मागे

'पुष्पा 2' चित्रपटाने 22 डिसेंबर 2024 रोजी नवीन इतिहास रचला आहे. गेल्या 110 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जे घडले नाही ते या चित्रपटाने केले आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 22, 2024, 05:52 PM IST
मागच्या  110 वर्षांत घडलं नाही ते 'पुष्पा 2'ने करुन दाखवलंय! 'बाहुबली 2' ही टाकलं मागे title=

Pushpa 2 Box Office Collection Day 18: 18 दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. 'पुष्पा 2' चित्रपटाने आजचा दिवस म्हणजेच 22 डिसेंबर रोजी इतिहास रचला आहे. 

'पुष्पा 2' चित्रपटाने 18 व्या दिवशी देशातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'बाहुबली 2' चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. चला तर मग जाणून घेऊयात 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडल्यानंतर या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे.

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सैक्निल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने 4 डिसेंबर रोजी प्रीमियरमधून 10.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईमध्ये दररोज वाढ होत गेली. ज्यामध्ये या चित्रपटाने 18 व्या दिवशी दुपारी 3.25 पर्यंत एकूण 1043.95 कोटींची कमाई केली. 

'पुष्पा 2'ने मोडला 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड

'पुष्पा 2' चित्रपटाने 17 व्या दिवशी 1029.9 कोटी रुपयांची  कमाई केली होती. भारतातील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत प्रभासचा 'बाहुबली 2' 1030.42 कोटींची कमाई करून पहिल्या क्रमांकावर होता. अशातच 'पुष्पा 2' चित्रपटाला फक्त 52 लाखांची कमाई करून 'बाहुबली 2' चित्रपटाला मागे टाकायचे होते आणि आज 'पुष्पा 2' चित्रपटाने ते केले आहे. 

'पुष्पा 2' चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. चित्रपटाची कमाई अजूनही सुरुच आहे. भारतातील पहिला चित्रपट 1913 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर 'पुष्पा 2' ने बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईचा आकडा आजपर्यंत कोणीही गाठू शकले नाही.  

चाहत्यांना 'पुष्पा 3' ची उत्सुकता

'पुष्पा 2' चित्रपटाच्या शेवटी, 'पुष्पा 3' शी संबंधित एक इशारा देण्यात आला आहे. याचाच अर्थ असा होती की, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल येत्या काही वर्षांमध्ये पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहेत. तथापि, 'पुष्पा 3' चित्रपटासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.