बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्युची नोंद जन्मवहीत!

बाळासाहेब ठाकरेंसह अनेक जणांच्या मृत्यूची नोंद जन्मवहीत करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण संपूर्ण मुंबईमधील स्मशानभूमींमध्ये मृत्यूवहीच उपलब्ध नाहीत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 8, 2013, 07:20 AM IST

www.24taas.com, मुंबई
बाळासाहेब ठाकरेंसह अनेक जणांच्या मृत्यूची नोंद जन्मवहीत करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण संपूर्ण मुंबईमधील स्मशानभूमींमध्ये मृत्यूवहीच उपलब्ध नाहीत. यासाठी स्टेशनरीचा तुटवडा असल्याचं कारण पुढे करण्यात आलं आहे. यातून मुंबई मनपाचा अजब कारभार समोर आला आहे.
या संदर्भात महापालिकेच्या प्रशासनाला यापूर्वी अनेकवेळा संपर्क केला गेला होता. पण त्याचा उपयोग झाला नाही. महापालिकेचे एक ज्येष्ठ नगरसेवक आपल्या एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी स्मशानात गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

दादारच्या स्मशानभूमीत बाळासाहेबांच्या मृत्यूची नोंदही जन्मवहीत करण्यात आली आहे. प्रशासनाकडून हलगर्जीपणा घडला आहे. २८ हजार कोटी रुपयांचं बजेट असलेल्या महापालिकेकडून तीन ते चार वर्षं एक वही उपलब्ध होऊ नये, ही दुःखद बाब आहे.