पालिकेच्या शाळेपेक्षा खासगीच बरी!

मुंबई महापालिका एका विघार्थ्यांवर तब्बल 50 हजार रूपये खर्च करूनही विघार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण 30 हजारांच्या घरात गेलयं.याचवेळी खाजगी शाळा एका विघार्थ्यांवर वर्षाला 36 हजार रूपये खर्च करते.या खाजगी शाळेतील विघार्थ्यांची गुणवत्ता वाढते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 19, 2012, 10:27 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिका एका विघार्थ्यांवर तब्बल 50 हजार रूपये खर्च करूनही विघार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण 30 हजारांच्या घरात गेलंय.याचवेळी खाजगी शाळा एका विघार्थ्यांवर वर्षाला 36 हजार रूपये खर्च करते.या खाजगी शाळेतील विघार्थ्यांची गुणवत्ता वाढते.तर महापालिकेच्या शिक्षणाचा दर्जा,गुणवत्ता घसरत असल्याचा सर्वेक्षण अहवाल प्रज्ञा फाऊडेशन संस्थेच्या उघड झालंय.
मुंबई महापालिका 2400 कोटी शिक्षण विभागावर खर्च करते. तरीही पालिकेच्या शिक्षणाचा दर्जा खालावतोय. महापालिका एका विद्यार्थ्यावर तब्बल 50 हजार रूपये खर्च करते तरीही विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण 30 हजारांच्या घरात आहे. महापालिकेच्या शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता घसरत असल्याचा सर्वेक्षण अहवाल प्रज्ञा फाऊंडेशन संस्थेनं दिलाय.
हा अहवाल वर्ल्ड बँकेकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रज्ञा फाऊण्डेशननं दिल्याचा आरोप पालिका शिक्षक संघटनेनं केलाय. प्रज्ञाच्या या सर्वेक्षणात दहावीत पालिका शाळांमध्ये उत्तीर्ण होणा-यांची टक्केवारी 58 इतकी आहे. तर डी वॉर्ड मलबार हिलमधल्या पालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण सर्वात जास्त असल्याच उघड झालंय.