कधी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, बिस्किट खाऊन काढले दिवस; आज 81 कोटींची कमाई

Actor in his Struggling Day  : या अभिनेत्याची शाळेची फी भरण्यासाठी आई नातेवाईकांकडून मागायची पैसे... 

दिक्षा पाटील | Updated: Dec 22, 2024, 03:48 PM IST
कधी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, बिस्किट खाऊन काढले दिवस; आज 81 कोटींची कमाई title=
(Photo Credit : Social Media)

Rajkummar Rao : बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावनं कायम त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. यंदाच्या वर्षी त्याचा 'स्त्री 2' हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. पण आज कोटींची कमाई करणारा राजकुमार रावनं कधी बिस्किट खाऊन दिवस काढले होते. आज सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा राजकुमार राव हा कधी निर्मात्यांची पहिली पसंत देखील नव्हता. पण त्यानं त्याच्या करिअरमध्ये हटके भूमिका साकारल्या आहेत. 

आज राजकुमार राव बॉलिवूडवर राज्य करतोय. त्याशिवाय तो त्याला आज कोणतीही आर्थिक समस्या देखील नाही. राजकुमार रावनं 2010 मध्ये करिअरची सुरुवात केली होती. आज तो इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. पण करियरच्या सुरुवातीला त्यांनं अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या आहेत. आमिर खान आणि करीना कपूरच्या तलाश या चित्रपटामध्ये देखील त्यानं एक भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यानं आमिर खानच्या असिस्टंटची भूमिका साकारली होती. पण त्याची भूमिका ही फार छोटी होती पण त्याच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राज शमनीच्या पॉडकास्टमध्ये त्याच्या खासगी आयुष्यासंबंधीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्याच्या संघर्षाविषयी सांगताना राजकुमार राव म्हणाला की त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती ही ठीक नसल्यानं, तीन वर्ष त्याच्या शाळेच्या शिक्षकानं त्याची फी भरली होती. त्याची आई कधी-कधीतर त्याच्या शाळेची पुस्तक घेऊन जाण्यासाठी आणि ट्यूशनसाठी नातेवाईकांकडून पैसे घ्यायची. 

हेही वाचा : 'कितीही प्रार्थना केली तरी, ती माझ्यासोबत कधीच...'; आई विषयी बोलताना अर्जुन कपूर भावूक

राजकुमार रावनं यावेळी सांगितलं की एक वेळ अशी होती जेव्हा त्याच्या बॅंक अकाऊंटमध्ये फक्त 18 रुपये होते. त्याच्या स्ट्रगलच्या काळात त्यानं बिस्किट आणि फ्रुटी खाऊन दिवस काढले. पण आज त्यानंच ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. राजकुमारचा चित्रपट 'स्त्री 2' नं जगभरात 850 कोटींचं कलेक्शन केलं. त्याची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. इतकंच नाही तर त्याचे चाहते हे फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. राजकुमार रावचे इन्स्टाग्रामवर 8.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.