पुणे

अपडेट : माळीण गाव ढिगाऱ्याखाली, 160 दबल्याची भीती

पुण्यातील आंबेगावमधील माळीण गाव पहाटे गाढ झोपेत असताना डोंगराचा एक अख्खा भाग कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. येथील ५० ते ६० घरांचे अख्यं गाव डोंगराखाली गाढले गेले. या मोठ्या दुर्घनेतील दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

Jul 30, 2014, 01:04 PM IST

राज्यात पावसाचा तडाखा, माळीण गावावर डोंगर कोसळून ६० घरे गाडली

राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा नाशिक, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव येथील माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्याने ५० ते ६० घरे गाडली गेलीत. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तर नाशिकमध्ये पाथर्डी येथे इमारतीचा एक भाग कोसळलाय. तर माळशेज घाट आणि कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.

Jul 30, 2014, 12:10 PM IST

नाना पाटेकरांनी पुण्यात तरुणांना काय दिला सल्ला

 तरुणांनी आपली ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरावी असा सल्ला अभिनेते नाना पाटेकर यांनी पुण्यात तरुणांना दिला. पुणे पोलिसांच्यावतीने आयोजित 'ऑन लाईन तरुणाई' या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी तरुणाईशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्य़ा वैयक्तीक आठवणी शेअर केल्या.

Jul 24, 2014, 08:30 PM IST