पुणे

‘माशी स्पर्श' झाला आणि एका महिलेला मिळालं पद!

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सातकरस्थळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चक्क एका माशीनं मतदानाचा हक्क बजावलाय. होय, एका माशीनं मतदान केल्यामुळेच संजीवनी थिगळे या महिलेची उपसरपंचपदी निवड झालीय. 

Jul 1, 2014, 07:46 PM IST

पुण्याच्या पाणीकपातीची 10 कारणं

गायब झालेल्या पावसाच्या नावानं जो, तो खडे फोडतोय. पण गेल्या वर्षी हा पाऊस दणकून बरसला होता. त्यावेळी धरणं तुडुंब भरली होती. पण ते पाणी नीट साठवलंच गेलं नाही.... त्याचीच शिक्षा आता पुणेकरांना पाणीकपातीच्या रुपानं भोगावी लागतेय.

Jun 30, 2014, 11:53 PM IST

पुणे तिथे ‘पाणी’ उणे... पाणीकपात लागू

अखेर पुण्यात पाणीकपात लागू झालीय. शनिवारपासून पुणेकरांना दिवसात एकच वेळ पाणी मिळणार आहे. महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक झाली. त्यात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. 

Jun 27, 2014, 08:56 AM IST

पावसाची दांडी; 'पाणी... पाणी' करण्याची वेळ येणार?

राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं राज्यावर  दुष्काळाचं सावट पसरलंय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय. पावसाअभावी कोकणातलं भातशेतीचं गणित बिघडण्याची चिन्हं आहेत. इथं दुबार पेरणीची पाळी शेतकऱ्यांवर येणार, अशी चिन्हं दिसतायत.

Jun 26, 2014, 11:48 AM IST

पुण्यात अशीही घटना...इच्छाशक्ती असेल तर...

ऐकून विश्वास बसणार नाही, पण गेल्या १० वर्षात घडली नाही ती गोष्ट पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये घडली. महापालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण गणवेशासह शालेय साहित्य उपलब्ध झालंय. त्यामुळे इच्छाशक्ती असेल तर कुठलीही लोकोपयोगी योजना अपेक्षित वेळेत राबवणं अवघड नसल्याचं स्पष्ट झालंय.

Jun 18, 2014, 10:25 AM IST

`बाबां`वर सुप्रीया सुळेंचा निशाणा; `दादां`वर मात्र चुप्पी

`मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एकाच कामासाठी पन्नास पत्रं लिहिली तरीही फाईल पेन्डिंग आहे`.... कुणा सामान्य माणसाची ही व्यथा नाही तर, खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांची ही व्यथा आहे.

Jun 16, 2014, 08:48 PM IST

मोहसीन शेख हत्या, २१ आरोपींना न्यायालयीन कोठडी

पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपी धनंजय देसाई याच्यासह सर्व २१ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Jun 12, 2014, 05:43 PM IST

निगडीमधील आधुनिक वटसावित्री...

पिंपरी चिंचवडमधील निगडीमध्ये राहणा-या जनाबाई गोरे. जनाबाई या भागात ओळखल्या जातात त्या एक बांधकाम व्यवसायिक म्हणून. कधीही शाळेत न गेलेल्या आणि अंत्यक प्रतिकूल परिस्थिती मधून आलेल्या जनाबाईंचा सामान्य कामगार ते एक बांधकाम व्यावसायिक हा प्रवास कोणालाही थक्क करणारा असाच.

Jun 12, 2014, 08:06 AM IST