पुणे

पुण्यातल्या गणेशोत्सवाचं रूप पालटलं!

तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज कमालीचा बदललाय. हा निश्चितच बदलत्या काळाचा परिणाम आहे, असं असलं तरी गणपतीच्या सणाला आलेलं निव्वळ इव्हेंटचं स्वरूप काहीसं निराशाजनकच म्हणावं लागेल. पुण्यातील गणेशोत्सवाचं स्वरुपही खूप बदललंय.  

Sep 3, 2014, 10:05 PM IST

पुण्यात मार्क्सवादी पक्ष कार्यालयाची तोडफोड

पुण्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाची काही तरुणांनी तोडफोड केली. याबाबत कम्युनिस्ट पक्षाने भाजपकडे बोट दाखविले आहे. भाजपला सत्तेचा माज आलाय, असा हल्लाबोल नेते भालचंद्र कांगो यांनी केलाय. कांगो याचा हल्ला भाजप नेते आमदार गिरीष बापट यांनी परतवून लावलाय. 

Sep 2, 2014, 05:12 PM IST

पुणेकरांची कमाल... 'त्यां'ना वाचवण्यासाठी बस धरली उचलून!

पुण्यात वेगात जाणाऱ्या एका बाईकनं एका बसला धडक दिल्यानं बाईकवर बसलेले दोन तरुण बसच्या चाकाखाली सापडले... परंतु, उपस्थित असलेल्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता प्रसंगावधान दाखवल्यानं या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले. 

Sep 2, 2014, 01:30 PM IST

पोलिसांवर राजकीय दबाव, उपमुख्यमंत्र्यांची कबुली

पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. हिंजवडीच्या पोलीस स्टेशनचं उद्धघाटन अजित पवारांनी केलं त्यावेळी ते बोलत होते.  

Aug 31, 2014, 10:12 PM IST

बाप्पासाठी पुण्यात रंगली मोदक स्पर्धा!

बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळं गणेशोत्सवात मोदकांचं महत्त्व औरच असतं. पुण्यात प्रबोधन संस्थेनं आयोजित केलेल्या मोदक स्पर्धेत तब्बल 2 हजार 200 महिला सहभागी झाल्या होत्या. साहजिकच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक या ठिकाणी पाहायला मिळाले. 

Aug 31, 2014, 08:40 PM IST

माळीण दुर्घटनेला महिना झाला तरी भोग कामय

 आज 30 ऑगस्ट. बरोब्बर 1 महिन्यापूर्वी 30 जुलैला पुणे जिल्ह्यातले माळीण हे हसतं-खेळतं गाव दरडीखाली गाडलं गेलं. या भीषण दुर्घटनेला महिना उलटला असताना गावक-यांच्या अक समस्या अद्याप कामय आहेत.

Aug 30, 2014, 09:50 AM IST