पुणेकरांची कमाल... 'त्यां'ना वाचवण्यासाठी बस धरली उचलून!

पुण्यात वेगात जाणाऱ्या एका बाईकनं एका बसला धडक दिल्यानं बाईकवर बसलेले दोन तरुण बसच्या चाकाखाली सापडले... परंतु, उपस्थित असलेल्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता प्रसंगावधान दाखवल्यानं या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले. 

Updated: Sep 2, 2014, 01:30 PM IST
पुणेकरांची कमाल... 'त्यां'ना वाचवण्यासाठी बस धरली उचलून!   title=

पुणे : पुण्यात वेगात जाणाऱ्या एका बाईकनं एका बसला धडक दिल्यानं बाईकवर बसलेले दोन तरुण बसच्या चाकाखाली सापडले... परंतु, उपस्थित असलेल्या नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता प्रसंगावधान दाखवल्यानं या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले. 

सिग्नल तोडून भूर्रकन निघून जाण्याच्या प्रयत्नात बाईकनं बसला धडक दिली होती. या बाईकवर दोन तरुण सवार होते. या दोघांना धडक दिल्यानंतर बस समोरच्या ट्राफिक सिग्नलला जाऊन धडकली आणि थांबली... पण, यादरम्यान हे दोघेही तरुण बसच्या टायरखाली अडकले होते.  

बस थांबताच उपस्थित नागरिकांनी बसकडे धाव घेतली.... आणि सगळ्यांची धडपड सुरू झाली ती या दोन तरुणांचे प्राण वाचवण्याची... 

बसला एका बाजुला उचलून धरत नागरिकांनी तरुणांना बाहेर काढलं. जखमी झालेल्या या तरुणांना लगेचच हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोघांचीही प्रकृती व्यवस्थित आहे. 

पुण्याच्या नागरिकांचा हा धाडसीपणा खरोखरच कौतुक करण्याजोगा आहे. या धाडसीपणामुळेच या दोन तरुणांचे प्राण वाचलेत.

नुकताच, असा एक प्रकार ऑस्ट्रेलियामध्येही पाहायला मिळाला होता. इथं, नागरिकांनी ट्रेनला उचलत एकाचे प्राण वाचवले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.