माळीण दुर्घटनेला महिना झाला तरी भोग कामय

 आज 30 ऑगस्ट. बरोब्बर 1 महिन्यापूर्वी 30 जुलैला पुणे जिल्ह्यातले माळीण हे हसतं-खेळतं गाव दरडीखाली गाडलं गेलं. या भीषण दुर्घटनेला महिना उलटला असताना गावक-यांच्या अक समस्या अद्याप कामय आहेत.

Updated: Aug 30, 2014, 09:51 AM IST
माळीण दुर्घटनेला महिना झाला तरी भोग कामय title=

पुणे : आज 30 ऑगस्ट. बरोब्बर 1 महिन्यापूर्वी 30 जुलैला पुणे जिल्ह्यातले माळीण हे हसतं-खेळतं गाव दरडीखाली गाडलं गेलं. या भीषण दुर्घटनेला महिना उलटला असताना गावक-यांच्या अक समस्या अद्याप कामय आहेत.

ज्यांची घरं मातीच्या ढिगा-यात गाडली गेली, त्यांना अद्याप नवी घरं मिळालेली नाहीत. त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन अडीवरे या गावात होणार असलं तरी ती घरं अद्याप बांधून झालेली नाहीत. दोन-चार दिवसांपूर्वीच त्याचं काम कसंबसं सुरू झालंय.

पावसाचा अडथळा असल्याचा दावा कंत्राटदार करत असला तरी पुनर्वसनाचा प्रश्न मात्र त्यामुळे लोंबकळत पडलाय. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. शाळेचे वर्गही सध्या अन्य शाळांच्या इमारतींमध्ये भरत आहेत. 

या दुर्घटनेतून बालंबाल बचावलेल्यांच्या अंगावर गेल्या महिन्यातल्या त्या घटनेनं आजही काटा येतो. अशाच एका आजोबांनी याबाबत माहिती देताना अंगवार शहारे येतात असे सांगितले. तर गावक-यांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अधिकच गहन बनलाय. उन्हाळ्यात तर पाण्यासाठी आणखी हाल होतील, अशी परिस्थिती आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.